Lokmat Sakhi >Social Viral > चांदीचे पैंजण काळे पडलेत-चमक गेली? ३ ट्रिक्स, नव्यासारखे चमकतील पैंजण-घरीच होईल पॉलिश

चांदीचे पैंजण काळे पडलेत-चमक गेली? ३ ट्रिक्स, नव्यासारखे चमकतील पैंजण-घरीच होईल पॉलिश

Home How To Clean Silver Jewelry at Home : चांदीचे पैंजण, जोडवी, ब्रेसलेट  चमकवण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूया. कमीत  कमी वेळात तुमचे दागिने स्वच्छ करण्याचं काम  होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 13:30 IST2025-09-12T11:18:35+5:302025-09-12T13:30:48+5:30

Home How To Clean Silver Jewelry at Home : चांदीचे पैंजण, जोडवी, ब्रेसलेट  चमकवण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूया. कमीत  कमी वेळात तुमचे दागिने स्वच्छ करण्याचं काम  होईल.

What Is The Fastest Way To Clean Silver Jewelry at Home How To Clean Silver anklets At Home | चांदीचे पैंजण काळे पडलेत-चमक गेली? ३ ट्रिक्स, नव्यासारखे चमकतील पैंजण-घरीच होईल पॉलिश

चांदीचे पैंजण काळे पडलेत-चमक गेली? ३ ट्रिक्स, नव्यासारखे चमकतील पैंजण-घरीच होईल पॉलिश

चांदीचे पैंजण  (Silver Jewelry) घालायला बऱ्याच महिलांना आवडतं. पण रोज पायांत घातले जाणारे हे पैंजण मेंटेन करणंही तितकंच कठीण काम. पैंजणांची पॉलिश निघून जाते आणि रोज वापरल्यामुळे काळे पडतात. असे काळे पडलेले पैंजण सणासुधीला किंवा रोजच्या वापरातही बरोबर दिसत नाहीत. पॉलिश करण्यासाठी वेगळे पैसे न घालवता तुम्ही घरच्याघरी पैंजण पॉलिश करू शकता. (Cleaning Hacks) पैंजण पॉलिश करण्यासाठी तुम्हाला घरगुती साहित्य लागेल.  चांदीचे पैंजण, जोडवी, ब्रेसलेट  चमकवण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूया. कमीत  कमी वेळात तुमचे दागिने स्वच्छ करण्याचं काम  होईल. (Home How To Clean Silver Jewelry at Home)

बेकिंग सोडा आणि लिंबू

चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करणं एक उत्तम उपाय आहे. याचा वापर करण्यासाठी एका वाटीत १ चमचा बेकींग सोडा घ्या. त्यात अर्धा लिंबू मिसळा. यानंतर ही पेस्ट चांदीच्या दागिन्यांवर लावा. नंतर टुथब्रशनं हलक्या हातानं स्क्रब करा. ५ मिनिटं तसेच ठेवून कोमट पाण्यानं दागिने स्वच्छ करा मग स्वच्छ कापडानं पुसून घ्या. हा उपाय केल्यानं दागिने एकदम सुंदर, छान चमकतील.

टुथपेस्ट

 तुम्हाला आश्चर्य वाटेल  पण दात घासण्यासाठी वापरली जाणारी पेस्ट  चांदीचे दागिने चमकवण्यासाठी उपयोगी ठरते. यासाठी तुम्हाला जेलवाली टुथपेस्ट घ्यावी लागेल. अशा टुथपेस्टनं दागिन्यांची स्वच्छता चांगली होईल. दागिने स्वच्छ करण्यासाठी  टुथपेस्ट दागिन्यांवर लावा नंतर हलक्या हातानं साफ करा. नंतर दागिने पाण्यानं धुवा आणि सुक्या कापडानं पुसून घ्या. या पद्धतीनं तुम्ही चांदीचे पैंजण आणि अंगठ्या चमकवू शकता. 

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत अर्धा कप  व्हिनेगर घ्या. त्यात २ चमचे  बेकिंग सोडा घाला. त्यात चांदीचे दागिने २ ते ३ तास भिजवून ठेवा नंतर ब्रश करून दागिन्यांची स्वच्छता करा. चांदीचे दागिने चमकवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. या उपायानं काळे डाग साफ होण्यास मदत होईल.

Web Title: What Is The Fastest Way To Clean Silver Jewelry at Home How To Clean Silver anklets At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.