Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याला आहे एक खास नाव! वाचा काय असतं त्यांच्या रडण्याचं कारण

नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याला आहे एक खास नाव! वाचा काय असतं त्यांच्या रडण्याचं कारण

New Born Baby Interesting Facts  : तुम्हाला माहीत आहे का की, जन्मानंतर जास्तीत जास्त बाळं रडतात, पण असं का होतं? यामागचं कारण काय असतं. बहुतेकांना याचं कारण माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 17:45 IST2026-01-31T16:56:13+5:302026-01-31T17:45:11+5:30

New Born Baby Interesting Facts  : तुम्हाला माहीत आहे का की, जन्मानंतर जास्तीत जास्त बाळं रडतात, पण असं का होतं? यामागचं कारण काय असतं. बहुतेकांना याचं कारण माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

What is the crying of a newborn baby called, and what is the reason for their crying? | नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याला आहे एक खास नाव! वाचा काय असतं त्यांच्या रडण्याचं कारण

नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याला आहे एक खास नाव! वाचा काय असतं त्यांच्या रडण्याचं कारण

New Born Baby Interesting Facts  : कोणत्याही बाळाच्या जन्माचा क्षण हा फारच वेगळा, मनात घालमेल, धाकधूक असलेला असतो. आपण कधी प्रत्यक्षात हे अनुभवलं असेल किंवा सिनेमातील एखाद्या सीनमध्ये पाहिलं असेल. या क्षणातील एक सगळ्यात खास बाब म्हणजे बाळाच्या जन्मानंतर त्याचा रडण्याचा पहिला आवाज. बाळाच्या जन्मानंतर ऐकू येणारा पहिला रडण्याचा आवाज हा नेहमीच आनंद आणि चांगल्या आरोग्याचं प्रतीक मानला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की, जन्मानंतर जास्तीत जास्त बाळं रडतात, पण असं का होतं? यामागचं कारण काय असतं. बहुतेकांना याचं कारण माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

जन्मताच बाळांच्या क्षमता

प्रत्येक आई-बापाला आपल्या नुकत्याच झालेल्या बाळाची काळजी असते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, बाळ जन्मताच अशा काही क्षमता घेऊन येत असतं, ज्यांच्या मदतीने ते नव्या वातावरणात जुळवून घेतं. जसे की, जन्मानंतरच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये बाळे फक्त काळा आणि पांढरा रंग पाहू शकतात,ते अश्रूंशिवाय रडतात, तसेच एकाच वेळी श्वास घेणे आणि गिळणे ही क्रिया सहज करू शकतात. आता आपण बाळे जन्मानंतर लगेच का रडतात हे पाहुयात...

बाळ जन्मताच रडतेच का?

वेगवेगळ्या रिपोर्टनुसार, जन्मताच बाळाचं रडणं हा बाळ जिवंत आणि निरोगी असल्याचा संकेत मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, जन्मानंतर बाळाचं रडणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी फुफ्फुसे पूर्णपणे उघडण्यास मदत करते, श्वसन प्रक्रिया सुरू करते, ही गर्भाशयातील उबदार वातावरणातून बाहेरील थंड वातावरणात झालेल्या बदलाची नैसर्गिक प्रतिक्रिया असते. बाळ रडल्यामुळे फुफ्फुसांमध्ये साचलेला कफ बाहेर पडतो आणि त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो.

बाळाच्या पहिल्या रडण्याला काय म्हणतात?

सामान्यपणे आपण बाळाच्या रडण्याला Cry किंवा Weep असं म्हणतो. मात्र हे शब्द जन्मानंतर रडणाऱ्या बाळांसाठी वापरले जातात. पण जन्मताच बाळाने काढलेल्या पहिल्या रडण्याच्या आवाजासाठी वेगळा शब्द आहे. wordsmith.org नुसार, नवजात बाळाच्या पहिल्या रडण्याला “Vagitus” (व्हॅजिटस) असं म्हटलं जातं.

Web Title : नवजात शिशु के रोने का एक खास नाम और कारण होता है।

Web Summary : नवजात शिशु का पहला रोना, जिसे 'वैजिटस' कहा जाता है, जीवन और फेफड़ों के विकास का प्रतीक है। यह तरल पदार्थ साफ करता है, सांस लेना शुरू करता है और बाहरी दुनिया के अनुकूल होने में मदद करता है, जो अच्छे स्वास्थ्य का संकेत है।

Web Title : Newborn baby's cry has a special name and reason.

Web Summary : A newborn's first cry, called 'Vagitus,' signifies life and lung development. It clears fluids, initiates breathing, and helps adapt to the outside world, indicating good health.