Join us

भटक्या कुत्र्यांची भीती की काळजी? दहशत की प्रेम?-नेमकं चुकतंय कुठं आणि कुणाचं..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2025 18:09 IST

What is happening in Delhi? Fear or concern for stray dogs? Terror or love? - Who exactly is at fault ? : भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सगळ्याच शहरांमध्ये गंभीर आहे, पण त्या प्रश्नावर तोडगा निघत का नाही?

लाघवी, प्रेमळ आणि वफादार असे ज्या प्राण्याबद्दल म्हटले जाते तो प्राणी म्हणजे कुत्रा. माणसापेक्षाही कुत्रा प्रिय असणारे अनेक जण असतात. तुमच्या ओळखीतही असतील. भटक्या कुत्र्यांना खाऊ-पिऊ घालणाऱ्या अनेक संघटना कार्यरत आहेत. (What is happening in Delhi? Fear or concern for stray dogs? Terror or love? - Who exactly is at fault ? )असे अनेक जण आहेत, ज्यांनी समाजकार्य म्हणून भटक्या कुत्र्यांची सेवा करण्यासाठी मोहिम हाती घेतली. रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांमुळे इतरांना धोका आहे हा विषय गेले काही महिने सगळीकडे सुरु होता. खास म्हणजे दिल्लीत.दिल्लीच्या रस्त्यावर पाहीले तर कुत्र्यांच्या टोळ्या नाक्यानाक्यावर बसलेल्या दिसतात. या सगळ्या कुत्र्यांना गोळा करुन शेल्टरमध्ये ठेवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. गेल्या काही दिवसांपासून प्राणीप्रेमी आणि सुप्रीम कोर्ट यांमध्ये कुत्र्यांवरुन  प्रचंड वाद सुरु आहे. मात्र नक्की असा काय प्रकार घडला की कोर्टाने असा निर्णय घेतला असावा? 

गेल्या काही दिवसांमध्ये माणसांवर खास म्हणजे लहान मुलांवर कुत्र्यांची झुंड हल्ला करताना दिल्लीच्या रस्त्यांवर दिसत होती. कुत्र्यांना त्रास द्यायला न जाणाऱ्या माणसांवर कुत्रे हल्ला करुन त्यांना रसत्यावर फरफटत होते. लहान मुलांना रस्त्यावर खेळायला सोडणे तसेच कोणालाही एकट्याने फिरणे कठीण झाले. एक दोन नाही तर भरपूर अशा हल्यांनंतर कोर्टाने हा निर्णय घेतला. WHO ने सांगितल्यानुसार, जागतिक आकडेवारीत रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ३६ % मृत्यू भारतात होतात. रेबिजचे प्रमाण भारतात जास्त आहे आणि आजही रेबिजवर प्रभावी तोडगा शोधता आलेला नाही. त्यामुळे कोर्टाला त्यांनी घेतलेला निर्णय अजिबात चुकीचा वाटत नाही. 

दुसरीकडे प्राणीप्रेमींचे म्हणणे असे आहे की, चार कुत्रे पिसाळतात म्हणून अख्खी प्राण्याची जमात कोंडून ठेवणे हा उपाय असू शकत नाही. मुळात कुत्र्यांना वॅक्सिन देणे, त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. भारतातील प्राणी निवारा ठिकाणे अजिबात चांगली नाहीत. तिथे प्राण्यांची काळजीही घेतली जात नाही तसेच एवढ्या कुत्र्यांना ठेवता येईल एवढी जागाही कुठल्या निवारा क्षेत्राची नाही. त्यामुळे कोर्टाने निर्णय बदलून त्यावर तोडगा काढावा अशी मागणी अॅनिमल अॅक्टिविस्ट करत आहेत. पालकांचे म्हणणे आहे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अनेक पालकांच्या मनात मुलांसाठी बसलेली भीती नक्कीच योग्य आहे. मात्र सगळ्या कुत्र्यांना असे बंद करणे योग्य आहे का? असा प्रश्न सोशल मिडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलकुत्रादिल्लीआरोग्यप्राणी