Lokmat Sakhi >Social Viral > ट्रम्प यांच्या स्वागताला करण्यात आलेले महिलांचे ‘ते’ नृत्य कोणते, त्याला नेमके म्हणतात काय?

ट्रम्प यांच्या स्वागताला करण्यात आलेले महिलांचे ‘ते’ नृत्य कोणते, त्याला नेमके म्हणतात काय?

What exactly is the name of the dance performed by women to welcome Trump? : स्वागत आणि आनंद याच्या जगभर विविध रीती आहेत, केस मोकळे सोडून नृत्याची ही रीत अजूनच वेगळी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2025 18:16 IST2025-05-16T18:13:31+5:302025-05-16T18:16:11+5:30

What exactly is the name of the dance performed by women to welcome Trump? : स्वागत आणि आनंद याच्या जगभर विविध रीती आहेत, केस मोकळे सोडून नृत्याची ही रीत अजूनच वेगळी.

What exactly is the name of the dance performed by women to welcome Trump? | ट्रम्प यांच्या स्वागताला करण्यात आलेले महिलांचे ‘ते’ नृत्य कोणते, त्याला नेमके म्हणतात काय?

ट्रम्प यांच्या स्वागताला करण्यात आलेले महिलांचे ‘ते’ नृत्य कोणते, त्याला नेमके म्हणतात काय?

प्रत्येक समाजाच्या, देशाच्या वेगवेगळ्या रीतीभाती- परंपरा असतात. नृत्य हा प्रकारही त्यात येतो. (What exactly is the name of the dance performed by women to welcome Trump?)एखाद्या खास प्रसंगी नृत्य करायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. सध्या सगळीकडे अशाच एका खास नृत्याची चर्चा सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अरब दौऱ्याचा एक व्हिडिओ सध्या फार व्हायरल झाला आहे.  ट्रम्प यांच्या स्वागतताला विविध वाद्यं वाजवण्यात आली मात्र लोकांचे लक्ष वेधले ते एका अनोख्या नृत्याने. काही महिला पांढरे शुभ्र कपडे घालून लांबलचक केस मोकळे सोडून, विशिष्ट हातवारे करत केस उडवत होत्या.  हे कोणते नृत्य याबाबत उत्सुकता अनेकांना वाटली. तर त्या  नृत्य प्रकाराला 'अल-अय्याला' असे म्हटले जाते. 

अल-अय्यला काय आहे?

हा एक अरबी पारंपारिक नृत्य प्रकार आहे. महिला पांढरे शुभ्र कपडे घालतात आणि मग मोकळे सोडलेले लांब केस उडवतात. ड्रम सारखे एक वाद्य असते. जे फक्त पुरुष वाजवतात. त्याच्या तालावर महिला नाचतात. (What exactly is the name of the dance performed by women to welcome Trump?)लग्नात हे नृत्य केले जाते. तसेच अरबमधील मोठ्या कार्यक्रमांमध्ये हे नृत्य केले जाते. काही खास क्षणी हे नृत्य करतात. आनंद व्यक्त करण्यासाठी तसेच परंपरा जपण्यासाठी अल-अय्याला केले जाते. पुरुषांच्या हातात ड्रम वाजवण्यासाठी बांबूच्या काठ्या असतात. त्या काठ्या युद्धाचे प्रतिक म्हणून ओळखल्या जातात. पुरुष समोरासमर उभे राहून वाद्य वाजवतात. वाद्याबरोबर नृत्य केले जाते आणि त्या तालावर कविताही म्हटली जाते. हा प्रकार म्हणजे कविता, वादन व नृत्याचे मिश्रण आहे. काही मुले हातात काठ्या घेऊन युद्धाचा देखावा तयार करतात. समोरामसोर उभे राहून तालावर युद्धाचे प्रदर्शन केले जाते. महिला अरबी पुरुषांप्रमाणे पांढरे कपडे घालतात. अख्खा पांढरा लांबलचक कुर्ता असतो. 

पाहुण्यांचे स्वागत करण्याच्या विविध पद्धती आपण पाहतच असतो. मात्र असे केस उडवून केलेले स्वागत फारच वेगळे व अनोखे आहे. त्यामुळे ते फार व्हायरल झाले आणि त्याची चर्चा आहे.

Web Title: What exactly is the name of the dance performed by women to welcome Trump?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.