साड्या हा महिलांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. साड्यांनी कपाट भरलेलं असतं. पण तरीही नव्या साड्या घेण्याचा मोह आवरत नाही. एवढंच नाही तर जुनी साडीही टाकून द्यावी वाटत नाही. कारण अगदी प्रत्येक साडीत खूप जीव असतो. पण हाच मोह कधी कधी एखाद्याच्या म्हणजेच अगदी पोटच्या पोराच्या जिवावर कसा उठू शकतो, याविषयीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ फरिदाबाद शहरातला असून तो २०२२ या वर्षीचा आहे. पण सध्या तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एक उंच अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटच्या साधारण पाचव्या किंवा सहाव्या मजल्यावर ही घटना घडत आहे. एका महिलेची साडी तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून खालच्या मजल्यावरच्या बाल्कनीमध्ये पडली. बहुतेक तिथे कोणीही राहात नसावं. आता साडीमध्ये तर महिलांचा प्रचंड जीव. त्यामुळे ती साडी मिळविण्यासाठी त्या महिलेने खूपच धोकादायक असा प्रकार केला. तिने चक्क तिची एक साडी बाल्कनीतून खाली साेडली. त्या साडीला लटकून तिचा मुलगा खाली गेला. साडी घेतली आणि मग पुन्हा साडीला लटकला. मग त्या महिलेने ती साडी ओढून मुलाला वर घेतली. हे सगळं त्या व्हिडिओमध्ये पाहतानाही जिवाचा अक्षरश: थरकाप होतो. कारण थोडीशी जरी चूक झाली असती तर थेट ती मुलाच्या जिवावर बेतली असती. भलेही ती साडी कितीही महागडी का असेना पण मुलाच्या जिवापेक्षा नक्कीच मोठी नाही. साडीपेक्षा मुलांचा जीव स्वस्त झाला का, असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून अचंबित झालेले कित्येक लोक त्या महिलेला विचारत आहेत..
Web Summary : In Faridabad, a mother endangered her son by lowering him down a balcony to retrieve a fallen saree. The video sparked outrage, questioning the saree's worth compared to her child's safety.
Web Summary : फ़रीदाबाद में, एक माँ ने गिरी हुई साड़ी को निकालने के लिए अपने बेटे को बालकनी से नीचे उतारकर उसकी जान जोखिम में डाल दी। वीडियो से आक्रोश फैल गया, जिसमें बच्चे की सुरक्षा की तुलना में साड़ी के मूल्य पर सवाल उठाया गया।