घरी आपण विविध वस्तू वापरतो. काही कॉमन गोष्टी असतात ज्या प्रत्येकाच्या घरी असतातच. रोजच्या वापराच्या या वस्तू विविध कंपनीच्या असतात. मात्र घरोघरी वापरल्या जातात. (What a great desi idea! Use leftover soap flakes in this way, use soap to the fullest)काही शरीराच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आपण वापरतो. जसे की ब्रश, पेस्ट, पावडर, तेल अशा अनेक वस्तू असतात. त्यापैकी एक वस्तू म्हणजे साबण. शरीर साफ करण्यासाठी साबण वापरला जातो. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे साबण बाजारात मिळतात. घरगुती साबण विकणारीही मंडळी आहेत. साबण वापरुन संपत आला की त्याचा लगदा होतो. अंग साफ करण्यासाठी तो वापरताना लिबलिबीत लागतो. तसेच अंगाला नीट लागतही नाही. अशावेळी तो साबण आपण दुसर्या नव्या साबणाला चिकटवतो आणि वापरुन संपवतो. पण तो वापरताना सारखा सटकत राहतो.
काहीही वाया जाऊ नये असा नियम भारतीय घरांमध्ये असतो. त्यामुळे तो साबण फेकण्याचीही गरज नाही आणि पडणारा साबण सारखा उचलत अंघोळ करायचीही गरज नाही. त्या साबणांच्या तुकड्यांचे हॅण्डवॉश तयार करा आणि हात स्वच्छ धुण्यासाठी त्याचा वापर करा. विकतच्या हॅण्डवॉशसारखेच वापरायचे. वापरणे अगदी सोपे आहे. तयार करणेही फारच सोपे आहे. कोमत्याही साबणाचे तुकडे चालतात. एकाच साबणाचे हवे असा काही नियम नाही. जेवढे तुकडे आहेत सगळे एकत्र करायचे. फक्त अंगाचाच साबण घ्यायचा. इतर साबण घेऊ नका.
कृती१. एका पातेल्यात पाणी घ्यायचे. गॅसवर गरम करत ठेवायचे. पाणी व्यवस्थित उकळू द्यायचे. उकळल्यानंतर गॅस बंद करायचा. साबणाचे उरलेले तुकडे घ्यायचे. ते जरा कुटायचे. किंवा मग चिरुन घ्यायचे. बारीक करायचे. मग ते तुकडे उकललेल्या गरम पाण्यात घालायचे. पाण्यात घालून साबणाचे तुकडे व्यवस्थित मिक्स करायचे. गॅस बंद केल्यावरच त्यात साबण घालायचा गॅसवर पाण्यासकट साबण उकळवू नका. ते पाणी एकदा ढवळा आणि मग रात्रभर साबण तसेच भिजत ठेवायचे. दुसर्या दिवशी सकाळी त्याचा लगदा झालेला असेल. साबण पाण्यात विरघळला असेल. हाताने ते जरा कुसकरायचे आणि मग हॅण्डवॉशच्या बाटलीत भरुन ठेवायचे.