Join us

हे काय भलतंच? जिलेबीवर ओतली बटाट्याची गरमागरम भाजी.. पाहा जिलेबी- भाजीचा व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2022 15:26 IST

Jalebi With Aloo Ki Sabji: गोड, चवदार, रसरशीत जिलेबीचे शौकिन असाल, तर जिलेबीसोबत केलेला हा विचित्र प्रयोग पाहून तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो. 

ठळक मुद्देजिलेबी आणि त्याच्यासोबत बटाट्याची गरमागरम रस्सा भाजी हा पदार्थ मथुरा, वृंदावन या भागात बराच प्रसिद्ध आहे.

खाद्यपदार्थांसोबत आता खूपच वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. आता खाण्याच्या पदार्थांमध्ये काहीतरी वेगळं करायचं म्हटलं की त्यात आपल्याला काही प्रयोग करावेच लागतात. पण प्रयोगाच्या नावाखाली तिखट आणि गोड पदार्थांचं वेगळंच कॉम्बिनेशन (Weird food combination) करायचं किंवा मग दोन विरुद्ध गुणधर्म असणाऱ्या पदार्थांना एकत्र आणायचं, असं काही काही होऊ लागलं की खवय्यांना मात्र या गोष्टीचा त्रास होऊ लागतो. आता रबडी- जिलेबी हे फूड कॉम्बिनेशन आपल्याला माहिती आहे आणि अनेक लोकांना ते आवडतंही. पण आता मात्र जिलेबीसोबत (Jalebi with aloo sabji) एक वेगळाच प्रयोग करण्यात आला आहे. 

 

whatsupdilli या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. फूड ब्लॉगर पलक कपूर यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. "Tried the most weird food combo ever!" अशी कॅप्शन देऊन त्यांनी या पदार्थांचं वर्णन केलं आहे.

पास्ता, नूडल्स मोकळ्या  हाेण्यासाठी सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर सांगतात २ टिप्स, चिकट - लगदा होणारच नाही

जिलेबी आणि त्याच्यासोबत बटाट्याची गरमागरम रस्सा भाजी हा पदार्थ मथुरा, वृंदावन या भागात बराच प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांनी या पदार्थाचा आस्वाद घेतला, असं त्यांनी सांगितलं. हा पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांनी ठिकठाक आहे, असं त्यांनी काही न बोलता त्यांच्या हातानेच खाणाखुणा करून सांगितलं आहे.

 

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हा पदार्थ घरच्याघरी चाखून पाहण्याची इच्छा झाली असेल, तर तुम्ही तो घरीही ट्राय करू शकता. यासाठी नेहमी करतो तशी बटाट्याची रस्सा भाजी करा.

'असे जिव्हारी लागणारे प्रसंगच तर..' सई ताम्हणकर सांगतेय, अपमान सहन करुनही झगडत राहण्याची ताकद..

एका बाऊलमध्ये जिलेबी ठेवा आणि त्यावर ही भाजी टाका. जिलेबी भाजीमध्ये पुर्णपणे भिजली की मग हा पदार्थ खाऊन बघा. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.