फ्रिजच्या खाली पाणी जमा होण्याची समस्या अनेकांना उद्भवते. इंस्टाग्रामवर उपाध्याय किचन नावानं सोशल मीडिया अकाऊंटवरून या समस्येचं सोल्यूशन दिलं आहे. हा जुगाड केल्यास फ्रिजमधून पाणी येण्याची समस्या टाळता येईल आणि तुम्हाला काही करावंच लागणार नाही. अनेकदा फ्रिजमध्ये मोठा बिगाड झालेला नसतो. फ्रिजमधला एक छोटा होल बंद झाल्यामुळे ही समस्या उद्भवते जी तुम्ही काही मिनिटांत ठीक करू शकता. (Water Coming Out Of Refrigerator Here Is The Solution)
सगळ्यात आधी पाणी जमा होण्याच कारण काय ते समजून घ्या. फ्रिजमध्ये पाणी किंवा मॉईश्चर जमा झाल्यास ते छोट्या छोट्या छिद्रांमधून बाहेर येते आणि मागे लावलेल्या ट्रे मध्ये हे पाणी जमा होतं जे उष्णतेमुळे सुकतं. हे छोटे छिद्र घाणीमुळे बंद होतात ज्यामुळे पाणी व्यवस्थित बाहेर येऊ शकत नाहीत. (How To Clean Small Hole Of Fridge)
ही समस्या टाळण्यासाठी सगळ्यात आधी ड्रेनेज होल शोधायला हवे. हे छिद्र फ्रिजच्या आतल्या सगळ्यात मागच्या भिंतीवर असते. जे फ्रिजच्या आतील सगळ्यात खालच्या शेल्फच्या वर किंवा खाली असते. जिथून जास्त गारवा जनरेट होतो.यावर एक छोटा झाकण किंवा बॉक्ससारखं कव्हर असते. यात ते छिद्र दिसते. साफ सफाई करण्याआधी फ्रिज बंद करायला विसरू नका.
हे छोटं छिद्र साफ करण्यासाठी कान साफ करण्याची काडी
इअरबड एक उत्तम पर्याय आहे. याचं बारीक टोक छिद्रातील घाण काढून टाकते. इअरबड आत घालून हळूहळू गोल फिरवा. असं केल्यानं छिद्र हळूहळू साफ होईल. सफाई केल्यानंतर छिद्र व्यवस्थित काम करतं ते नाही ते पाहा. पाणी न थांबता छिद्रातून बाहेर येत असेल तर समजून जा की समस्या सुटली आहे.
हा छोटा उपाय फक्त ही समस्या सोडवत नाही तर महागड्या मॅकेनिक खर्चांपासूनही वाचवतो. महिन्यातून ३ ते ४ वेळा फ्रिजची सफाई करू शकता.फ्रिजमध्ये जास्त गरम किंवा न झाकलेलं चिकट अन्न ठेवू नका. यामुळे छिद्र बंद होऊ शकतात. फ्रिज दर १५ दिवसांनी स्वच्छ करत राहा. जास्त शिळे पदार्थ फ्रिजमध्ये साठवून ठेवू नका.
Web Summary : Blocked fridge drainage causes water leakage. An earbud clears the blockage easily. Locate the drainage hole, gently clean it with an earbud, and ensure proper water flow to resolve the issue.
Web Summary : फ्रिज के ड्रेनेज में रुकावट से पानी लीक होता है। ईयरबड से रुकावट आसानी से दूर करें। ड्रेनेज छेद ढूंढें, ईयरबड से धीरे से साफ करें, और पानी का प्रवाह ठीक करें।