Join us  

Vishal, meri shaadi 26 April ko hai…:  'मेरी शादी २६ एप्रिल को है!' व्हायरल होतेय विशालच्या गर्लफ्रेंडची १० रूपयांची नोट; नेटिझन्स म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 1:01 PM

Vishal, meri shaadi 26 April ko hai…: कुसुमने तिचा प्रियकर विशाल याला तिच्या मदतीसाठी येण्याची विनंती केली.

नोटांवर काहीही लिहिणे बेकायदेशीर आहे, परंतु यामुळे लोकांनी नोटांवर त्यांचे विचार लिहिणे थांबवले नाही. नुकतेच एका महिलेने तिच्या प्रियकरासाठी 10 रुपयांच्या नोटेवर एक चिठ्ठी लिहून तिचे लग्न ठरले असल्याने प्रियकराला तिच्यासोबत पळून जाण्यास सांगितले. (Viral Video) या नोटेचा फोटो सध्या व्हायरल होत असून, त्यावरून अनेक विनोदांची सुरुवात झाली आहे. (Woman writes message for lover on a Rs 10 note, netizens do their bit)

भारतातील प्रेमविवाह आजकाल अगदी सामान्य वाटत असले तरी, प्रत्येकजण मुक्तपणे निवडू शकेल असा पर्याय नाही. तर, कुसुम नावाच्या महिलेला अशाच संकटात सापडल्यावर तिने तिचा प्रियकर विशाल याला तिच्या मदतीसाठी येण्याची विनंती केली.

“विशाल, मेरी शादी 26 एप्रिल को है. मुझे भागा के ले जाना. मी तुझ्यावर प्रेम करते. तुम्हारी कुसुम (विशाल, माझे लग्न २६ एप्रिलला निश्चित झाले आहे. माझ्यासोबत पळून जा. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझी कुसुम),” असा संदेश या नोटेवर लिहिलाय. एका ट्विटर वापरकर्त्याला ही नोट सापडली, त्याने विशालला संदेश मिळावा या आशेने ती नोट ऑनलाइन शेअर केली. “ट्विटर दाखवा तुमची शक्ती… असं कॅप्शन दिलं आहे.

२६ एप्रिलपूर्वी कुसुमचा हा संदेश विशालला पोहोचवला पाहिजे… प्रेमात असलेल्या दोन व्यक्तींनी एकत्र येणे आवश्यक आहे"  असे वापरकर्त्याने लिहिले. कृपया तुमच्या ओळखीच्या सर्व विशालला टॅग करा  प्रेयसीनं तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचण्याच्या हताश प्रयत्नांनी नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी ट्विटर वापरकर्त्यांनी तिचे आडनाव उघड करण्याची विनंती केली. आता, लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्व विशालला टॅग करत आहेत. काहींनी मजेदार मीम्सवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया