स्टार क्रिकेटर विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. कधी त्याचा खेळ हा चर्चेचा विषय होतो तर कधी त्याच्या डाएटवर भरभरून बोललं जातं. नाही म्हणायला बऱ्याचदा त्याचे आणि अनुष्काचे किस्सेही व्हायरल होतच असतात. आता मात्र एका अगदी वेगळ्या विषयामुळे तो चर्चेत आला आहे आणि तो विषय म्हणजे त्याच्या हातावर त्याने नुकताच काढून घेतलेला टॅटू. विराटला टॅटू विशेष आवडत असावेत, कारण या आधीही त्याने त्याच्या शरीरावर टॅटू काढून घेतलेले आहेतच. पण आता मात्र त्याने जे टॅटू काढलेले आहेत, ते खूप वेगळे आहेत..
आयपीएल मॅचेस सुरू होण्याच्या आधी विराटच्या हातावर हे टॅटू दिसून आलं. या टॅटूच्या वेगवेगळ्या चर्चाही रंगत आहेत. काही जण असं म्हणत आहेत की त्याच्या आयुष्याचा आजवरचा प्रवासच त्याने या टॅटूच्या माध्यमातून हातावर रेखाटला आहे.
वाळवण स्पेशल: उपवासाचे खमंग कुरकुरीत सांडगे, उपवासाला येईल खुसखुशीत चव, घ्या साेपी रेसिपी
शिवाय या टॅटूविषयीची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे टॅटू वेगन शाई वापरून काढण्यात आले आहेत. आपल्याला माहितीच आहे की विराट आणि पत्नी अनुष्का शर्मा हे दोघेही वेगन डाएट घेतात. त्यावर प्लांट बेस्ड पदार्थ खाण्यावर त्यांचा भर असतो. आता सामान्यपणे टॅटू काढण्यासाठी जी शाई वापरली जाते त्यात ॲनिमल फॅटचा काही प्रमाणात वापर केलेला असतोच.
त्यामुळे अशी शाई विराटच्या वेगन जीवनशैलीच्या अगदी विरोधात होते. म्हणूनच त्याने वेगन शाईचा पर्याय निवडला. वेगन इंक तयार करण्यासाठी प्राण्यांच्या कोणत्याही गोष्टीचा वापर करण्यात आलेला नाही.
Summer Special: टरबूज खाताना त्यावर चिमूटभर मीठ नक्की घाला, कारण.... वाचा ४ मोठे फायदे
शिवाय त्याची टेस्टिंगही प्राण्यांवर केलेली नाही. ही शाई तयार करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, कोको बटर, रोजहिप ऑईल असे घटक वापरण्यात आलेले आहेत. त्यामुळे तिला वेगन इंक म्हणतात. विराटमुळे आता टॅटू काढण्यासाठीच्या या वेगन इंकचा नवा ट्रेण्ड बाजारात नक्कीच येऊ शकतो.
