Lokmat Sakhi >Social Viral > जावई माझा भला! विराट कोहली म्हणतो, अनुष्काच्या आईबाबांनीही मला समजून घेतलंच ना, कारण..

जावई माझा भला! विराट कोहली म्हणतो, अनुष्काच्या आईबाबांनीही मला समजून घेतलंच ना, कारण..

Virat Kohli Expresses His Feelings About His In Laws: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या नात्याचा असाही एक खास कौटुंबिक पैलू (Virat Kohli says he is so much connected with wife Anushka Sharma's parents)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2025 14:54 IST2025-06-05T14:53:46+5:302025-06-05T14:54:47+5:30

Virat Kohli Expresses His Feelings About His In Laws: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या नात्याचा असाही एक खास कौटुंबिक पैलू (Virat Kohli says he is so much connected with wife Anushka Sharma's parents)

Virat Kohli expresses his feelings about his in laws, virat kohli says he is so much connected with wife Anushka Sharma's parents  | जावई माझा भला! विराट कोहली म्हणतो, अनुष्काच्या आईबाबांनीही मला समजून घेतलंच ना, कारण..

जावई माझा भला! विराट कोहली म्हणतो, अनुष्काच्या आईबाबांनीही मला समजून घेतलंच ना, कारण..

Highlightsअनुष्कानं विराटच्या आईशी जमवून घेतलं तसं विराटनं तिच्या.. लग्न चांगलं टिकायचं तर दोन्ही कुटूंबाची अशी साथही आवश्यकच असते!

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी खरोखरच लाखात एक. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं हे जोडपं. अगदी मैदानावरही विराटचं अनुष्कावर असलेलं प्रेम दिसून येतं. म्हणूनच तर तो कधी तिला भर मैदानातून लाखो लोकांसमोर अगदी बिंधास्तपणे तु जेवलीस का? मला फोन कर असं सांगतो- विचारतो.. विजय मिळवल्यानंतर त्याची नजर सगळ्यात आधी तिला शोधते.. आयपीएल जिंकल्यानंतरही आपण ते प्रेम पाहिलंच. आपल्या बायकोवर प्रेम करणारे अनेक असतात. पण तिच्यासोबत तिच्या माहेरच्या मंडळींनाही आपलंसं करणारे, त्यांना आपल्याच कुटूंबाचा भाग मानणारे खूप कमी असतात (Virat Kohli expresses his feelings about his in laws). पण विराटने मात्र त्यातही बाजी मारली असून त्याच्या सासरेबुवांशी तर त्याची विशेष गट्टी आहे..(Virat Kohli says he is so much connected with wife Anushka Sharma's parents)

 

काही दिवसांपुर्वी विराटने स्काय स्पोर्ट्सला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याला घरगुती विषयावर जो एक प्रश्न विचारण्यात आला, त्या प्रश्नाचं उत्तर देताना विराट म्हणाला होता की अनुष्काचे आईवडील कोणी वेगळे, माझ्यासाठी नवे आहेत, असं मला मुळीच वाटलं नाही.

किचनमधले ५ पदार्थ चेहऱ्याला लावा, महागडी बोटॉक्स ट्रिटमेंट केल्यासारखी चमक येईल चेहऱ्यावर

अगदी आमची भेट झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनीही मला स्वीकारलं आणि मलाही ते माझे जवळचे वाटले. तिचं सगळं कुटूंबच खूप छान असून मी त्यांच्यामध्ये पटकन सामावून गेलो.

 

अनुष्का शर्माचे बाबा आणि विराट कोहली यांच विशेष बॉण्डिंग आहे. विराट म्हणतो की ते खूपच फ्रेंडली असून मी त्यांच्याशी कोणत्याही विषयावर अगदी मनमोकळं बोलू शकताे. माझ्या कित्येक गोष्टी मी त्यांना शेअर करतो. ते आर्मीमध्ये होते.

कुंडीतली घट्ट झालेली माती बदलायला वेळ नाही? घ्या उपाय, माती होईल भुसभुशीत- रोपही छान वाढतील

त्यामुळे त्यांचा कोणत्याही गोष्टीबाबतचा दृष्टीकोन अगदी निर्भिड आणि स्पष्ट असतो. त्यांची ही गोष्ट त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलताना मला नेहमी जाणवते. अनुष्काचे आईवडील आणि भाऊ यांच्याकडून मला नेहमीच आदर मिळाला. माझ्यावर ते मनापासून प्रेम करतात, मला समजून घेतात. त्यामुळेच आम्ही एकमेकांशी कदाचित एवढे लवकर कनेक्ट होऊ शकलो. अनुष्कानं विराटच्या आईशी जमवून घेतलं तसं विराटनं तिच्या.. लग्न चांगलं टिकायचं तर दोन्ही कुटूंबाची अशी साथही आवश्यकच असते!

 

Web Title: Virat Kohli expresses his feelings about his in laws, virat kohli says he is so much connected with wife Anushka Sharma's parents 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.