Join us

Viral Video : 'ओए साले, पहले साड़ी दिया और अब..' अनुपम खेर यांच्या आईचे साडीवर प्रेम, खास व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 15:35 IST

Viral Video : प्रत्येकजण साडीबद्दल बोलतो. ज्यांनी साड्या दिल्या त्यांचे आभार असे अनुपम खेर यांची आई म्हणते.  त्यानंतर अनुपम यांच्या आई साडीबद्दल सांगतात की ती जाड आणि जड आहे.

अनुपम खैर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि मजेदार व्हिडिओ शेअर करत असतात. ते त्यांच्या आईसोबतचे अनेक व्हिडिओही शेअर करतात. आता त्यांनी एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते त्याच्या आईकडून साडी परत घेतात जी त्यांना त्याच्या मित्रांनी भेट दिलेली असते. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, त्याची आई दुलारी खेर आणि वहिनी रीमा खेर अनुपमसोबत दिसत आहेत. (Story anupam kher take back his mother gifted saree she says oye saale)

प्रत्येकजण साडीबद्दल बोलतो. ज्यांनी साड्या दिल्या त्यांचे आभार असे अनुपम खेर यांची आई म्हणते.  त्यानंतर अनुपम यांच्या आई साडीबद्दल सांगतात की ती जाड आणि जड आहे. अनुपम म्हणतात कोण जाड? तर त्या म्हणतात की ही साडी.  त्यावर अनुपम म्हणतात ठीक आहे मला वाटलं तू तुझ्याबद्दल बोलत आहेस. तेव्हा त्या म्हणतात की मी जाड नाही, मी फिट आहे.

वाह, मित्राच्या लग्नात पोरांनी साडी नेसून माधुरीच्या गाण्यावर धरला ठेका; पाहा जबरदस्त व्हिडिओ

अनुपम यांनी विचारले की आत त्यांना कशात इंटरेस्ट आहे. त्यावेळी  त्या म्हणतात की, पाठ करण्यात इंटरेस्ट आहे. नंतर अनुपम त्यांच्या आईचे पाय खेचत साडी नेसण्यात रस नसल्सास साडी परत घेऊन जातो असं म्हणतात. त्यानंतर त्यांच्या आई 'ओए साले, पहले साड़ी दिया और अब वापस ले जा रहा है।' अशी रिएक्शन देतात. 

टॅग्स :अनुपम खेरसोशल व्हायरल