lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > मुलाने शेअर केली वडिलांची दहावीची मार्कशीट, 'सगळ्या विषयात झाले फेल आणि म्हणे आम्हाला'..

मुलाने शेअर केली वडिलांची दहावीची मार्कशीट, 'सगळ्या विषयात झाले फेल आणि म्हणे आम्हाला'..

Viral Video : Son shared fathers 10th mark sheet in anger told everyone that he had failed : वडील मुलाला अभ्यास कर म्हणून तगादा लावायचे; म्हणून मुलाने केलं असं काही की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2024 03:27 PM2024-04-22T15:27:34+5:302024-04-22T15:28:27+5:30

Viral Video : Son shared fathers 10th mark sheet in anger told everyone that he had failed : वडील मुलाला अभ्यास कर म्हणून तगादा लावायचे; म्हणून मुलाने केलं असं काही की..

Viral Video : Son shared fathers 10th mark sheet in anger told everyone that he had failed | मुलाने शेअर केली वडिलांची दहावीची मार्कशीट, 'सगळ्या विषयात झाले फेल आणि म्हणे आम्हाला'..

मुलाने शेअर केली वडिलांची दहावीची मार्कशीट, 'सगळ्या विषयात झाले फेल आणि म्हणे आम्हाला'..

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आई-वडील मुलांना अभ्यास कर म्हणून तगादा लावतात (Viral Video). काही मुलं स्वतःहून अभ्यासाला बसत नाहीत. त्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून द्यावे लागते. मुख्य म्हणजे दहावीत पालक मुलांना करिअरच्या दृष्टीने बरेच सल्ले देत असतात. शिवाय आपण किती खस्ता खाऊन शिक्षण पूर्ण केले, याबाबत मुलांना सांगत असतात. ज्यामुळे मुलांना अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. पण सध्या एक दहावीची मार्कशीट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यात एका मुलाने आपल्या वडिलांची दहावीची मार्कशीट सोशल मीडियात पोस्ट केली आहे.

व्हायरल दहावीच्या मार्कशीटमध्ये वडील प्रत्येक विषयात फेल झाले असून, मुलाने व्हिडिओमध्ये वडिलांच्या मार्कशीटबद्दल बरंच काही म्हटलं आहे. जे ऐकून तुम्हाला देखील हसू अनावर होईल(Viral Video : Son shared fathers 10th mark sheet in anger told everyone that he had failed).

पोलीस कॉन्स्टेबलच्या बहिणीची लग्नपत्रिका व्हायरल; लग्नात नक्की या पण, मतदान..

'पिताजी की मार्कशीट मिल गयी'

व्हायरल व्हिडिओ एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मुलाने आपल्या वडिलांची दहावीची मार्कशीट शेअर केली आहे. यासोबत फोटो शेअर करत मुलाने ऑडिओ क्लिप देखील शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, 'मित्रांनो, आमचे वडील आम्हाला पास होण्यासाठी खूप ओरडायचे. पण आमच्या वडिलांची दहावीची मार्कशीट बघा. जितके पण विषय आहेत, त्या सगळ्यात आमचे वडील फेल झाले होते. पाहा.'

घरात एसी नाही? टेन्शन कशाला? फॅनच्या हवेमुळेही खोली होईल थंड- विजेची देखील होईल बचत

मुलाने वडिलांच्या मार्कशीटवर तयार केला मिम

व्हायरल व्हिडिओवर अनेक युजर्झनी मनोरंजक कमेंट्स केल्या आहेत. एकाने 'यासाठी तर वडील तुला दहावीत पास हो म्हणत आहेत.' तर दुसऱ्या नेटकऱ्याने 'मी पण नुकतीच माझ्या वडिलांची दहावीची मार्कशीट पाहिली.' तर इतरांनी हसण्याची इमोजी शेअर केल्या आहेत. तर या व्हायरल पोस्टला ३ लाखांहून अधिक युजर्झने पाहिले असून, शेअरही अधिक नेटकऱ्यांनी केलं आहे.

Web Title: Viral Video : Son shared fathers 10th mark sheet in anger told everyone that he had failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.