Join us

आई गेली परीक्षेला आणि पोलिस ताईंनी सांभाळलं तिच्या तान्ह्या लेकीला.. बघा पुण्यातला हा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 18:38 IST

Viral Video of Police And A Baby Girl: बाहेरून कडक वाटणाऱ्या खाकी वर्दीतलं मातृहृदय पुन्हा एकदा यानिमित्ताने सगळ्यांना दिसलं.. म्हणूनच तर एवढा जबरदस्त  व्हायरल होतो आहे हा व्हिडिओ.

ठळक मुद्देगार्गीलाही त्यांच्यातली मायेची ऊब जाणवली आणि पुढच्या काही वेळातच ती शांत होऊन त्यांच्या कुशीत मस्तपैकी खेळू लागली. 

पुर्वी लग्न झालं की मुलींचं शिक्षण थांबायचं. लग्न हा जणू त्यांच्या शिक्षणासाठी मोठा फुलस्टॉप ठरायचा. पण आता मात्र शिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्याने मुली स्वत: तर त्याबाबत जागरुक झाल्याच आहेत, पण त्यांचे कुटूंबियही त्यांना विशेष साथ देत आहेत. त्यामुळेच तर लग्नच काय पण मुलं झाल्यानंतर पुढचे शिक्षण घेणाऱ्या अनेक जणी आज आपण आजूबाजूला पाहतो. म्हणूनच तर तान्ह्या लेकराला घेऊन किंवा गरोदरपणात परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या अनेक जणींचे फोटो नेहमीच व्हायरल (Viral Video) होत असतात. ही एक कहाणीही त्यातलीच..(Police took care of a baby girl)

 

पुणे महानगरपालिकेतर्फे नुकत्याच विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षा देण्यासाठी एक महिला तिच्या चार महिन्यांच्या लेकीला गार्गीला सोबत घेऊन आली होती.

रश्मिका मंदाना म्हणते कामही सांभाळा, कुटुंबालाही वेळ द्या सोपं नसतं; मी जमवलं..पण...

परीक्षा देण्यासाठी केंद्रात गेल्यावर तिचे पती मुलीकडे लक्ष देणार होते. पण आई परीक्षा द्यायला आत गेली आणि अवघ्या काही वेळातच गार्गीने वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. हळूहळू तिचं रडणं सुरू झालं. वडिलांनी त्यांच्या परीने तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण नंतर मात्र तिचं रडणं वाढतच गेलं आणि मग तिच्या वडिलांकडून ती काही आवरली जाईना.. ती जोरजोरात रडू लागली.

 

त्या केंद्रावर काही महिला पोलिसांची ड्यूटी होती. गार्गीचं अविरतपणे सुरू असलेलं रडणं आणि तिच्या वडिलांकडून तिला शांत करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न दोन पोलिस ताई बघत होत्याच.

घरात पाल दिसली की भीती वाटते? ३ उपाय, पाली आपल्या घरापासून राहतील लांब

पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गार्गीला शांत करणं हे वडिलांना जमण्यासारखं नाही, तेव्हा त्यांनी पुढाकार घेतला आणि आईच्या आठवणीने रडणाऱ्या त्या लेकराला मायेची ऊब देऊन शांत केलं. गार्गीलाही त्यांच्यातली मायेची ऊब जाणवली आणि पुढच्या काही वेळातच ती शांत होऊन त्यांच्या कुशीत मस्तपैकी खेळू लागली. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलपोलिसपरीक्षा