lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > अबब, मिक्सर आहे की..! टीव्ही-फ्रीजचीही चटकन चटणी करणारा पाहा मिक्सर, लोक म्हणाले -हे वाटण कशासाठी?

अबब, मिक्सर आहे की..! टीव्ही-फ्रीजचीही चटकन चटणी करणारा पाहा मिक्सर, लोक म्हणाले -हे वाटण कशासाठी?

Viral Video of World Largest Blender : हा विचित्र प्रकार करणाऱ्यांना नेटीझन्सने विचारले एकाहून एक प्रश्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2023 04:13 PM2023-08-30T16:13:05+5:302023-08-30T16:15:24+5:30

Viral Video of World Largest Blender : हा विचित्र प्रकार करणाऱ्यांना नेटीझन्सने विचारले एकाहून एक प्रश्न...

Viral Video of World Largest Blender : is it a mixer..! Look at the mixer, which quickly mixes the TV-fridge, people said - what is this for? | अबब, मिक्सर आहे की..! टीव्ही-फ्रीजचीही चटकन चटणी करणारा पाहा मिक्सर, लोक म्हणाले -हे वाटण कशासाठी?

अबब, मिक्सर आहे की..! टीव्ही-फ्रीजचीही चटकन चटणी करणारा पाहा मिक्सर, लोक म्हणाले -हे वाटण कशासाठी?

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काहीच नेम नसतो. जगाच्या कानाकोपऱ्यात कोणी काही केले की अगदी काही क्षणात इंटरनेटच्या माध्यमातून ते जगभर व्हायरल होते. यामुळे एगदी एका क्लिकवर आपल्याला जगात कुठे काय चालले आहे ते कळू शकते. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये आपण जगातला सर्वात मोठा मिक्सर तयार केला असल्याचा दावा या तरुणांनी केला आहे. ते युट्यूबर असून हाऊ रेडीक्यूलस असे त्यांच्या युट्यूब चॅनेलचे नाव आहे. मिक्सर ही घरातील अतिशय महत्त्वाची गोष्ट असून विविध गोष्टी वाटण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. पण मिक्सरमध्ये कोणी टिव्ही आणि फ्रिज टाकून ते बारीक केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे? या युट्यूबरनी असे केले आहे (Viral Video of World Largest Blender) . 

अंगाचा साबण संपत आला की चिपट्या फेकून देता? करा ४ उपयोग, उरलेल्या साबणापासून मिळतील भन्नाट गोष्टी

आता कितीही मोठा मिक्सर तयार केला तरी तो दाखवण्यासाठी असं काही करण्याची आवश्यकता आहे का हा प्रश्न अनेकांनी या व्हिडिओवर उपस्थित केला आहे. या मिक्सरचे पातेही अतिशय मोठे आणि भारदस्त आहे. हा मिक्सर हँडल करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा त्यांनी बाजूला तयार केली असल्याचे दिसते. त्याठिकाणी बसून ते या मिक्सरमध्ये काही ना काही गोष्टी घालून त्यांचे तुकडे कसे होतात हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहेत. अगदी काही सेकंदात या मिक्सरमध्ये वस्तू क्रश होत असल्याचे दिसते. कलिंगड आणि खरबूज, क्रेट भरुन टेनिस बॉल, प्लास्टीकचे मोठे काही अशा बऱ्याच गोष्टी हे तरुण टेस्टींगसाठी या ब्लेंडरमध्ये घालतात. 

यानंतर हे तरुण चक्क डबल डोअर फ्रिज आणि टीव्हीही या ब्लेंडरमध्ये घालतात. काही सेकंदांत या वस्तूंचे तुकडे तुकडे झालेले आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. टेस्टींग करायचे म्हणून हे ठिक आहे पण इतक्या महागाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अशाप्रकारे मिक्सर करुन वाया का घालवायच्या असा प्रश्न नोटीझन्स त्यांना विचारताना दिसतात. अशाप्रकारे इलेक्ट्रॉनिक वस्तू मिक्सरमध्ये ब्लेंड करणे हे धोकादायक असू शकते असेही काही जणांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करताना म्हटले आहे. काही जणांनी त्यांना सायको म्हटले असून या तरुणांनीही व्हिडीओच्या शेवटी मिक्सरच्या गिअर बटणावर सायको असे लिहीलेले दिसते. 
 

Web Title: Viral Video of World Largest Blender : is it a mixer..! Look at the mixer, which quickly mixes the TV-fridge, people said - what is this for?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.