Join us

डिव्होर्स मुबारक! नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर ‘ती’ अशी नाचली की.. पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2024 16:47 IST

Viral Video Of Divorce Party: घटस्फाेट झाल्यानंतर पार्टी आयोजित करून त्या पार्टीत बिंधास्तपणे नाचणारी पाकिस्तानी महिला सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे....(woman arrange special party for the celebration of her divorce)

ठळक मुद्देतिचा तो व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला असून आता घटस्फोट पार्टीचा नवा ट्रेण्ड येतो की काय, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

वैवाहिक जीवन सुरू होण्याच्या आधीची बॅचलर्स पार्टी किंवा स्पिन्स्टर पार्टी तुम्ही ऐकली असेल. अशा पद्धतीच्या पार्टी आता खूप कॉमन झाल्या आहेत. वैवाहिक जीवनाची उत्साहात सुरुवात करण्यासाठी या पार्टी आयोजित केल्या जातात. पण एका पाकिस्तानी महिलेने चक्क स्वत:चा घटस्फोट झाला म्हणून जंगी पार्टी आयोजित केली होती (viral video of divorce party). या पार्टीत ती महिला अशी काही नाचली की तिचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेेत...(woman arrange special party for the celebration of her divorce)

 

कोण कधी काय करेल ते सांगताच येत नाही. असंच काहीसं या महिलेचं झालं. आजकाल घटस्फोट होण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुर्वी घटस्फोट झाला की त्या महिलेकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन खूप काही चांगला नसायचा. त्यामुळे बायका सासरी त्रास सोसायच्या पण घटस्फोटाचा विचारही करायच्या नाहीत.

ड्रेसचा गळा खूपच मोठा झाला? १ मिनिटांत करा १ छानशी ट्रिक- तुमचा ड्रेस होईल अधिकच स्टायलिश

आता नवरा- बायको दोघंही समजुतदारीने घटस्फोट घेतात आणि वेगळं झाल्यानंतरही एकमेकांशी चांगले संबंध ठेवतात. नातं तुटणं हे त्रासदायक आहेच. पण तरीही नात्यामध्ये खूपच घुसमट निर्माण झाली असेल, एकमेकांसोबत राहण्यात अजिबातच आनंद वाटत नसेल तर दोघेही जण स्वखुशीने हा मार्ग स्विकारतात. या व्हायरल व्हिडिओमध्येही कदाचित या महिलेचं असंच झालं असावं.

 

त्यामुळेच तर ती लग्नाच्या बंधनातून मुक्त झाल्याचा एवढा आनंद साजरा करते आहे. तिची सेलिब्रेशन करण्याची पद्धत मात्र जगावेगळी आहे, हे निश्चित. 'शादी बन गयी उमर कैद की सजा' या गाण्यावर ती अतिशय बिंधास्त होऊन नाचतेय

केस खूप गळतात पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही? १ सोपा उपाय- केस होतील दाट 

आणि त्या बंधनातून मुक्त झाल्याचा जल्लोष करते आहे. तिचा तो व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला असून आता घटस्फोट पार्टीचा नवा ट्रेण्ड येतो की काय, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलनृत्यघटस्फोट