Join us

हाय रामा ये क्या हुआ? ट्रेडमिलवर चालण्या-पळण्याऐवजी हा भाऊ पाहा काय करतोय, व्हायरल व्हिडिओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2022 13:51 IST

Viral Video of Dance on Treadmill : ट्रेडमिलवर एका तरुणाने असे काही केले की ते पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

ठळक मुद्देआता पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी त्याला प्रतिक्रियांमधून काही ना काही सल्ले दिले आहेत. व्यायाम थोडा इंटरेस्टींग करण्यासाठी त्याने केले असे काही...

ट्रेडमिल ही व्यायामासाठी असते हे आपल्याला माहित आहे. आपल्यापैकी अनेक जण जीममध्ये किंवा काही जण घरातही या मीलवर नियमितपणे व्यायामही करतात. मिलवर चालणे पाहून सोपे वाटत असले तरी ते शरीरासाठी काही वेळा कष्टाचे असते. यावर असलेल्या पट्ट्यावर पाय विशिष्ट लयीत लक्षपूर्वक फिरवल्याने कंबरेच्या खालच्या भागाचा चांगला व्यायाम होतो. अनेकांना ठराविक वेळ यावर व्यायाम केल्यानंतर घामाघूम व्हायला होते. आता हे सगळे ठिक आहे, पण ट्रेडमिलवर एका तरुणाने असे काही केले की ते पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मिलची लय मॅच करुन हा मुलगा यावर केवळ चालत नव्हता तर त्यावच चक्क डान्स करत होता. या मुलाचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून आपल्यापैकी अनेक जण नक्कीच चकीत होऊ शकतात (Viral Video of Dance on Treadmill). 

(Image : Google)

तर इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर असलेल्या अलोक शर्मा याने बॉलीवूडचा एकेकाळी गाजलेला चित्रपट ‘रंगीला’मधील प्रसिद्ध अशा ‘हाय रामा ये क्या हुआ...’ या गाण्यावर ट्रेडमिलवर डान्स केला. अशाप्रकारे हटके पद्धतीने ट्रेडमिलवर केलेला त्याच्या या डान्सचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. गाण्याच्या बोलांवर स्टेप्स परफेक्ट मॅच करत त्याने केलेला डान्स नेटीझन्सच्या पसंतीस उतरला. हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहून त्याला लाईकही केले आहे. अलोकने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याला कॅप्शन देताना ‘हाय रामा’ असे म्हटले आहे.

आलोक अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्यामुळे त्याचे चाहते आणि फॉलोअर्स नियमितपणे हे व्हिडिओ पाहत असतात. आताच्या व्हिडिओमध्ये त्याने जीन्सची हाफ पँट आणि त्यावर केशरी शर्ट घातल्याचे दिसते. या शर्टची बटणे त्याने जाणीवपूर्वक उघडी ठेवली असून त्यातून आपल्याला त्याने कमावलेली बॉडी दिसते. आता पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी त्याला प्रतिक्रियांमधून काही ना काही सल्ले दिले आहेत. काहींनी त्याला डान्स इंडिया डान्समध्ये ट्राय कर असे सांगितले तर नेहमी त्याच त्याच स्टेप्स काय, आता काहीतरी नवीन कर असंही आणखी एकाने म्हटले आहे.       

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्य