प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं...या मंगेश पाडगावकरांच्या प्रसिद्ध ओळीं अगदी जगजाहीर आहे. या वाक्यानुसार प्रेम म्हणजे अगदी सगळ्यांचंच सारखं असत...पण त्यामागची प्रत्येक जोडप्याची लव्हस्टोरी मात्र वेगळी असते... प्रेम करणं ही काही चुकीची गोष्ट नाही, पण आपल्या समाजाचा धाक आणि संकोचामुळे अनेकजण आपले रिलेशनशिप घरच्यांपासून लपवून ठेवतात. बऱ्याचदा अनेक जोडपी जेव्हा रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा ते आई-वडिलांपासून आपलं प्रेमप्रकरण लपवून ठेवतात...आईवडिलांच्या धाकात मुलं लपून-छपून आपल्या पार्टनरला भेटायला जातात. पण जेव्हा हेच प्रमप्रकरण रंगेहात पकडलं जातं तेव्हा कौंटुबिक राडा ठरलेलाच असतो. पण जरा विचार करा, जर या लपंडावात आपण रंगेहात पकडले गेलो तर? नक्कीच, कोणाच्याही काळजात धडधड होईल! डोळ्यासमोर येईल तो म्हणजे घरच्यांचा राडा, वडिलांचा ओरडा आणि आईचे धपाटे आणि रट्टे...(Viral Video Mother Caught Son With His Girlfriend & The Engagement Was Done At Metro Station).
पण सोशल मिडियावर सध्या एका वेगळ्याच घटनेची चर्चा रंगली आहे. एका आईने आपल्या मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं खरं, पण त्यानंतर तिने जे केलं त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शक्यतो, जर एखाद्या वेळी आईने जर आपल्या मुलीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं तर (video viral mother caught son with girlfriend) मुलाची मारझोड किंवा आरडाओरडा तर फिक्स आहेच पण याउलट आईने नेमकं काय केलं ते पाहूयात...
आपल्या आईने गर्लफ्रेंडसोबत पकडलं तर आपली काय अवस्था होईल, याचा विचारच करणे कठीण आहे. आपण सर्व या परिस्थितीचा विचार करता आई मुलाला मारेल किंवा ओरडेल असा विचार मनात येईल. पण अलिकडेच एक अनोखी घटना सोशल मिडीयावर व्हयरल होत आहे ज्यात आईने मुलाला रंगेहात त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तर पकडलं पण त्यानंतर जे केलं त्याने यूजर्सना आणखी आश्चर्यचकित केलं.
पैठणीचा नवा 'रॉयल' ट्रेंड! पिकॉक-पॅरेट बॉर्डर पाहून पडाल प्रेमात - पिढ्यांपिढ्या जपावी अशी पैठणी...
Delhi Metro स्टेशनवरील एक ७३ सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक आई आपल्या मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहते आणि क्षणाचाही विलंब न करता तिथेच मिठाई, कौटुंबिक विधी आणि आशीर्वाद देत त्यांचा चक्क साखपुडा करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आईने आपल्या मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मेट्रो स्टेशनवर पकडले. तिने लगेच तिथेच थेट त्यांचा साखरपुडा लावून दिला! हुशार आईने एकाच वेळी प्रकरण मिटवून टाकले; आता कोणतीही सबब राहणार नाही आणि लपूनछपून भेटण्याची गरजही भासणार नाही’. व्हिडिओमध्ये एक महिला मुलीला मिठाई आणि फळे देताना दिसून येते. ती दुसऱ्या व्यक्तीला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट करून मुलीच्या आई-वडिलांना दाखवण्यास सांगते. पुढे ती मुलीची ओढणी तिच्या डोक्यावर ठेवते आणि तिला मिठाई भरवत आपली सून म्हणून तिचा स्वीकार करते. जेव्हा तिचा मुलगा तिला वारंवार थांबण्याची विनंती करतो तेव्हा आई म्हणते की, “आमचा जो अपमान झाला त्याच काय”. व्हिडिओच्या शेवटी आई दोन्ही मुलांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देताना दिसते.
नेटकरी म्हणतात...
नेटकरी हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. काही युझर्सनी हा व्हिडीओ पूर्णपणे स्क्रिप्टेड असल्याचे म्हटले आहे. असं रंगवून दाखवल्यामुळे तो अजिबातच खरा वाटत नाही. काहींनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की कोणी मुलीच्या पालकांना विचारले की ते या नात्यासाठी तयार आहेत का. त्याच वेळी, बरेच लोक तो मजेदार आणि हलक्याफुलक्या पद्धतीने पाहत आहेत, जो व्हायरल कंटेंटप्रमाणे इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ @imannupurna नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आई मास्टरमाईंड निघाली, तिने प्रेमप्रकरणाचे थेट साखरपुड्यात रूपांतर करून टाकले! ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पालकांनी योग्य निर्णय घेतला”.
Web Summary : A mother caught her son with his girlfriend at a Delhi metro station. Instead of scolding them, she surprised everyone by immediately arranging their engagement with sweets and blessings, turning an awkward situation into a celebration.
Web Summary : दिल्ली मेट्रो स्टेशन पर एक माँ ने अपने बेटे को गर्लफ्रेंड के साथ पकड़ा। डांटने की बजाय, मिठाई और आशीर्वाद के साथ तुरंत सगाई करवाकर सबको चौंका दिया, और एक अजीब स्थिति को उत्सव में बदल दिया।