Join us

Viral video : लेकीनं म्हटलेली हिंदी कविता ऐकून अभिषेक बच्चनही खुश, पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:45 IST

Viral video : आराध्याचे स्वच्छ हिंदी उच्चार आणि आत्मविश्वास पाहून वडील अभिषेक बच्चनही सुखावले, लोक म्हणाले उत्तम पॅरेण्टिंग

बॉलीवूडचे सर्वात प्रसिद्ध कुटुंब आणि मेगा स्टार अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन (Aradhya bachchan) हिची  एक झलक पाहण्यासाठी फॅन्स आतुर असतात. अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे, ती तिच्या क्यूटनेसमुळे लोकांमध्ये चर्चेत असते.

नुकताच आराध्याचा देश भक्ती गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिची देसी स्टाइल सगळ्यांनाच आवडली होती. आता त्याचा आणखी एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Viral video abhishek bachchan reacts to aaradhya bachchans new viral video of reciting)

या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याची लाडकी लेक हिंदीमध्ये एक कविता वाचताना दिसत आहे, जी पाहून लोक तिची स्तुती करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. प्रेक्षकांसोबतच तिच्या वडिलांनीही यावर कमेंट करून त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये आराध्याचा काव्यात्मक अंदाज पाहून नेटकरी चकीत झाले आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आराध्या तिच्या अप्रतिम आवाजात कविता गाताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही कविता शुद्ध हिंदीत आहे. आराध्या अनेकदा असे परफॉर्मन्स देताना दिसते. तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर एका फॅनने शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत. या कमेंट्सपैकी एक कमेंट आराध्यासाठी खूप खास होती, जी तिचे वडील अभिषेक बच्चन यांनी केली होती.

आपल्या मुलीचे हे कौशल्य पाहून अभिषेकने  हात जोडून प्रतिक्रिया दिली. तिचे कौतुक करताना एका यूजरने लिहिले की, " ते आराध्याच्या जिन्समध्येच आहे.....सुपर टॅलेंटेड मुलगी." दुसर्‍याने तिच्या संगोपनाचे कौतुक करत म्हटले, "उत्तम पालकत्व." इतर अनेक वापरकर्त्यांनी तिला आशीर्वाद दिले.

हा व्हिडिओ आराध्याच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये 2021-22 मध्ये झालेल्या स्पर्धेतील आहे. यावेळी आराध्याने अनेक हिंदी कविता म्हटल्या होत्या. हा व्हिडिओ पाहून लोकांनी तिची आजोबा अमिताभ बच्चन आणि पणजोबा हरिवंशराय बच्चन यांच्याशी तुलना केली आहे. याआधीही आराध्याने तिचे कौशल्य अनेकवेळा लोकांसमोर मांडले आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलअभिषेक बच्चनसेलिब्रिटी