Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video - हृदयस्पर्शी! "माझा मुलगा मला एक क्षणही..."; ढसाढसा रडत आईने मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:37 IST

एका आईने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आपल्या लहान मुलासोबतचा अनुभव सांगितला आहे.

एका आईने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आपल्या लहान मुलासोबतचा अनुभव सांगितला आहे. आपला दोन वर्षांचा मुलगा आपल्याला एक मिनिटही सोडत नाही असं ही महिला रडत रडत सांगत आहे. इतकंच नाही तर या महिलेला साधं वॉशरुमला जाण्यासाठीही वेळ मिळत नाही. मुलाच्या हट्टामुळे हैराण झालेल्या या आईने व्हिडीओ शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आईने मुलाच्या संगोपनाशी संबंधित आव्हानं सांगितली आहेत. तिने सांगितलं की, तिचा मुलगा तिला एक क्षणही सोडत नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक पालकांनी या परिस्थितीशी सहमती दर्शवली असून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

आपल्या मुलाला सांभाळताना ही आई इतकी त्रस्त झाली की तिला व्हिडीओ बनवून आपलं दुःख व्यक्त करावं लागलं. व्हिडिओमध्ये महिला म्हणते की, तिचा मुलगा नेहमी तिच्यासोबतच असतो. मग ती जेवत असो किंवा बाथरूममध्ये जात असो. शांतपणे एक कप चहा पिण्यासाठीही तिला वेळ मिळत नाही, असंही तिने सांगितलं. मुलगा सतत 'मम्मा गोदी-मम्मा गोदी' असा हट्ट करत असतो.

बहुतेक घरांमध्ये आई आपल्या मुलांच्या हातात फोन देते, जेणेकरून त्या आपली दैनंदिन कामे शांतपणे करू शकेल. मात्र, या महिलेने सांगितलं की तिचा मुलगा टीव्ही किंवा मोबाईल पाहत नाही, त्यामुळे त्याला सतत कोणाची ना कोणाची सोबत लागते. भावूक होत ही महिला म्हणते, "प्रत्येक आई कधी ना कधी खचून जाते, कारण शेवटी आई सुद्धा एक माणूसच असते." आपलं दुःख सांगताना महिलेला रडू कोसळलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या महिलेच्या बोलण्यावर सहमती दर्शवली आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @babymodel_jashit नावाच्या हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. ३२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इतकेच नाही तर मोठ्या संख्येने युजर्स यावर कमेंट्स करत आहेत. अनेक युजर्सनी म्हटलं आहे की, हा अनुभव जवळपास प्रत्येक पालकाला येतो आणि याबद्दल उघडपणे बोलणं गरजेचं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mother's Heartfelt Plea: 'My Son Doesn't Leave Me For a Moment!'

Web Summary : A mother shared a video expressing her struggles with her clingy two-year-old son. She laments not even having time for basic needs, like using the restroom or enjoying a cup of tea, due to his constant demands for attention. The video resonated with many parents who shared similar experiences.
टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओ