Join us

औषधांची रॅपर्स फेकून देता? करून पाहा स्वयंपाकघरातील २ कामांसाठी वापर; भांडी होतील स्वच्छ, आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2024 18:26 IST

Use Of Medicine Wrapper for Kitchen Use : किचनमधली २ कामे होतील झटपट; फक्त औषधांच्या रॅपर्सचा वापर कसा आणि कुठे करावा? पाहा..

प्रत्येकाच्या घरात साधारण सर्दी-खोकला किंवा तापाचे औषध असतेच. गोळ्या खाल्ल्यानंतर आपण औषधांचे रॅपर फेकून देतो. याचा वापर पुन्हा होत नाही, जर झालाच याचा वापर कशासाठी करावा? असा प्रश्न निर्माण होतो. जर आपल्याही घरात औषधांची रिकामे रॅपर्स असतील तर, आपण याचा वापर स्वयंपाकघरातील अन्य कामांसाठी करू शकता (Medicine Wrappers).

मुख्य म्हणजे याच्या वापराने भांडी चकचकीत आणि मिक्सर ग्राइंडर ब्लेडला धार देण्यासाठी मदतीला येऊ शकते. पण याचा वापर नेमका कसा करावा? पाहा(Use Of Medicine Wrapper for Kitchen Use).

तव्याला मिळेल नवी चमक

पायात सतत गोळे येतात-मुंग्या येतात? कोलेस्टेरॉल तर वाढले नाही, वेळीच ओळखा लक्षणं

सर्वप्रथम, जळलेल्या तव्यावर मीठ, बेकिंग सोडा किंवा इनो घाला. त्यांनंतर त्यावर डिशवॉश लिक्विड घालून काही वेळ तसेच ठेवा. १० मिनिटानंतर तवा औषधांच्या रॅपर्सने घासून काळपट डाग काढा. नंतर स्क्रबरने तवा घासून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या ट्रिकमुळे काही मिनिटात तवा नव्यासारखा चमकेल. याच्या मदतीने आपण इतरही काळीकुट्ट भांडी स्वच्छ करू शकता.

मिक्सर ग्राइंडर ब्लेडला येईल धार

वजन कमी होईल म्हणून साखरेऐवजी गुळ खाता? तज्ज्ञ सांगतात वाढेल झपाट्याने वजन आणि..

औषधांच्या रॅपर्सच्या वापराने आपण मिक्सर ग्राइंडर ब्लेडला धार लावू शकता. पण मिक्सर ग्राइंडरची धार धारदार करण्यासाठी रॅपर कशा पद्धतीने काम करेल? असा प्रश्न नक्कीच तुम्हालाही पडला असेल. यासाठी कात्रीच्या मदतीने औषधांच्या पाकिटांचे छोटे-छोटे तुकडे करा. आता हे तुकडे जारमध्ये ठेवा आणि मिक्सरला २ मिनिटांसाठी फिरवा. यामुळे ब्लेडला धार येईल. आपण याचा वापर करून सुरीला देखील धार लावू शकतात. 

टॅग्स :सोशल व्हायरलऔषधंसोशल मीडिया