Lokmat Sakhi >Social Viral > झाडांची वाढ ते तुंबलेलं सिंक; ३ गोष्टींसाठी वापरा एक्सपायरी डेट उलटलेली औषधे

झाडांची वाढ ते तुंबलेलं सिंक; ३ गोष्टींसाठी वापरा एक्सपायरी डेट उलटलेली औषधे

Use of expired tablets and capsules : एक्स्पायरी डेट उलटलेली औषधं फेकून देण्यापूर्वी, ३ गोष्टींसाठी वापर करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 10:00 AM2024-05-23T10:00:00+5:302024-05-23T10:00:02+5:30

Use of expired tablets and capsules : एक्स्पायरी डेट उलटलेली औषधं फेकून देण्यापूर्वी, ३ गोष्टींसाठी वापर करून पाहा..

Use of expired tablets and capsules. | झाडांची वाढ ते तुंबलेलं सिंक; ३ गोष्टींसाठी वापरा एक्सपायरी डेट उलटलेली औषधे

झाडांची वाढ ते तुंबलेलं सिंक; ३ गोष्टींसाठी वापरा एक्सपायरी डेट उलटलेली औषधे

एक्स्पायरी डेट उलटून गेलेली औषधे खाऊ नयेत यात शंका नाही (Use of Expired Tablets). तसेच त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याचा सल्ला दिला जातो (Cleaning Tips). परंतु औषधे एक्सपायर झाल्यानंतरही आपल्या अनेक समस्या सोडवू शकतात. शिवाय अनेक गोष्टींसाठी लागणारा खर्चही वाचू शकतो. जर आपण एक्स्पायरी डेट उलटून गेलेली औषधे फेकून देत असाल तर, असे करू नका.

आपण याचा वापर झाडांवरचे किडे घालवण्यासाठी फवारणी तयार करू शकता. ब्लॉक ड्रेनेज साफ करण्यासाठी मदत होईल. शिवाय स्टेनलेस स्टीलच्या चमच्यांवरील गंज काढण्यासही मदत होईल. पण कालबाह्य झालेल्या औषधांचा वापर नेमका कसा करावा? पाहूयात(Use of expired tablets and capsules.).

झाडांवर फवारणी

आपण एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या औषधांचा वापर झाडांवर करू शकता. यासाठी, खलबत्त्यात गोळ्या घ्या. ठेचून गोळ्यांची पावडर तयार करा. तयार पावडर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. स्प्रे बॉटलमध्ये भरल्यानंतर त्यात पाणी ओता आणि झाकण लावा. तयार स्प्रे झाडांवर फवारा. यामुळे पानांवरची बुरशी आणि किडे, मुंग्या दूर होतील.

सकाळी की सायंकाळी? नेमकं कोणत्या वेळेत चालल्याने कॅलरीज जास्त बर्न होतात? वेट लॉस करायचं असेल तर..

ब्लॉक ड्रेनेज होईल साफ

अनेकवेळा कचरा साचल्याने किचन सिंक तुंबते. ही समस्या स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये उद्भवते. ब्लॉक ड्रेनेज साफ करण्यासाठी आपण प्लंबरला बोलावतो. पण प्लंबरला न बोलावता, आपण घरातच औषधांचा वापर करून सिंक साफ करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात गोळ्यांची पावडर घालून मिक्स करा. तयार पाणी सिंकमध्ये ओता. काही वेळात तुंबलेलं सिंक स्वच्छ होईल.

दुपारचं जेवणानंतर '५' गोष्टी न चुकता कराच; व्यायाम न करताही पोट होईल सपाट- वजनही घटेल

गंजलेले चमचे होतील स्वच्छ

स्टेनलेस स्टीलचे चमचे अनेकदा गंजतात. चमच्यावरील गंज काढण्यासाठी आपण गोळ्यांच्या पाकिटांचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात पाकिटांची तुकडे घाला. नंतर त्यात चमचे घालून काही वेळासाठी ठेवा. नंतर गॅस बंद करा, व पाण्यातून चमचे बाहेर काढून सुती कापडाने पुसा. या युक्तीमुळे चमचे काही वेळात चकाचक नव्यासारख्या दिसतील.

Web Title: Use of expired tablets and capsules.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.