घरात अनेक गोष्ट अशा असतात ज्यांचे एक नाही तर अनेक उपयोग करता येतात. पण आपल्याला ते माहितीच नसतात. घरात असणारी अशीच एक वस्तू म्हणजे फॉइल पेपर.(use foil paper for these 5 things) खासकरून कामावर जाणारी लोकं पोळ्या ठेवायला याचा वापर करतात. पराठे वगैरे या पेपर मध्ये छान गरम राहतात. तसेच डब्याला बाहेरून हा पेपर लावतात. जेणेकरून जेवण गार होणार नाही. पण मध्यंतरी फॉइल पेपर मुळे अन्न खराब होते. या बाबत वेगवेगळ्या बातम्या आल्या होत्या. त्या ऐकून अन्न ठेवण्यासाठी फॉइल पेपर वापरणं बंद केलं असेल तर, त्याचा वापर इतर ठिकाणी करा.(use foil paper for these 5 things)
फॉइल पेपरचे विविध उपयोग(use foil paper for these 5 things)
१.फॉइल पेपरचा वापर चमचे साफ करण्यासाठी होतो. बरेचदा चमच्यांवर डाग राहून जातात आणि वर्षानू वर्षे ते तसेच राहतात. जाता जात नाहीत. तेलाचे थर सुद्धा तसेच राहतात. शिवाय तडक्याचे डाग असतील तर, ते डाग जात नाहीत. अशावेळी गरम उकळत्या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा मीठ घाला. त्यात दोन फॉइल पेपर चुरगळून टाका. त्या पाण्यात चमचे ठेवा. पंधरा मिनिटांनी चमचे पाण्यातून काढा आणि स्वच्छ धुऊन घ्या.
२. कात्री, सुरी अशा धारदार वस्तूंची धार कमी होते. अशा वेळी फॉइल पेपरने धारेच्या भागावर घासा. कात्री सुरी आधी सारखी काम करायला लागेल.
३. इस्त्री करताना कपड्यांच्या खाली फॉइल पेपर ठेवा. असं केल्याने कपड्यांची इस्त्री कडक होते. कपडे जळत नाहीत.
४. गॅलेरीत बरेचदा कबुतर अंडी घालून जातात. रोपाजवळ किंवा झाडाला फॉइल पेपरचा तुकडा लावल्यास पक्षी लांब राहतात.
५. सिल्वर ज्वेलरी आजकाल ट्रेंडमध्ये आहे. ऑक्सिडाइज नथ, कानातले, हार बरेचदा वाऱ्याने किंवा धुळीने खराब होतात. दिसताना फार डल दिसायला लागतात. अशी ऑक्सिडाइज ज्वेलरीसुद्धा फॉइल पेपरने साफ करता येते. गरम पाण्यात बेकिंग सोडा आणि फॉइल पेपर टाका. त्यात ज्वेलरी ठेवा. नंतर फॉइल पेपरने घासा. ज्वेलरी पुन्हा नव्यासारखी दिसते.