Lokmat Sakhi >Social Viral > वाटीभर कोल्ड ड्रिंक करते काळेकुट्ट कढई - तवे स्वच्छ! भांडी दिसतील लखलखीत - पाहा सोपी ट्रिक...

वाटीभर कोल्ड ड्रिंक करते काळेकुट्ट कढई - तवे स्वच्छ! भांडी दिसतील लखलखीत - पाहा सोपी ट्रिक...

Use cold drink to clean burnt kadhi pan kitchen hack : clean burnt pan with cold drink : kitchen hack to clean burnt vessel : how to clean burnt kadhi pan : cold drink cleaning kitchen trick : remove burnt food stains with cold-drinks : easy hack to clean burnt utensils : clean burnt kadai with cold drink : कढई - तवे स्वच्छ करण्याचा पाहा हा स्वस्तात मस्त उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2025 17:29 IST2025-08-30T11:38:59+5:302025-08-30T17:29:05+5:30

Use cold drink to clean burnt kadhi pan kitchen hack : clean burnt pan with cold drink : kitchen hack to clean burnt vessel : how to clean burnt kadhi pan : cold drink cleaning kitchen trick : remove burnt food stains with cold-drinks : easy hack to clean burnt utensils : clean burnt kadai with cold drink : कढई - तवे स्वच्छ करण्याचा पाहा हा स्वस्तात मस्त उपाय...

Use cold drink to clean burnt kadhi pan kitchen hack clean burnt pan with cold drink how to clean burnt kadhi pan clean burnt kadai with cold drink | वाटीभर कोल्ड ड्रिंक करते काळेकुट्ट कढई - तवे स्वच्छ! भांडी दिसतील लखलखीत - पाहा सोपी ट्रिक...

वाटीभर कोल्ड ड्रिंक करते काळेकुट्ट कढई - तवे स्वच्छ! भांडी दिसतील लखलखीत - पाहा सोपी ट्रिक...

आपल्या स्वयंपाक घरातील काही भांडी अशी असतात जी हमखास रोजच वापरली जातात. रोज वापरल्या जाणाऱ्या भांड्यांमध्ये कढई, तवा, पॅन अशी काही मोजकी भांडी (Use cold drink to clean burnt kadhi pan kitchen hack) कायमच असतात. स्वयंपाक घरातील काही भांडी ही रोजच्या वापराने इतकी खराब होतात की, त्यांना स्वच्छ करणे म्हणजे मोठे कठीण काम असते. कढई, तवा, पॅन यांसारखी भांडी वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छ केली नाहीत तर त्यावर काळपट, चिकट थर हळूहळू (clean burnt kadai with cold drink) जमा होऊ लागतो. अशा भांड्यांवरील (clean burnt pan with cold drink) हा काळपट थर सहज निघता निघत नाही, मग ही भांडी स्वच्छ करण्यासाठी फार घासून मोठ्या मेहेनतीने स्वच्छ करावी लागतात( how to clean burnt kadhi pan).

अनेकदा तर फार कष्ट घेऊन तासंतास भांडी जोर लावून घासावी लागतात. मग अशी काळीकुट्ट भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण अनेक नवनवीन उपाय करुन पाहतो. महागडे लिक्विड सोपं, क्लिनर्स विकत आणतो परंतु याचा (kitchen hack to clean burnt vessel) देखील हवा तसा परिणाम काहीवेळा दिसून येत नाही. अशा परिस्थितीत, आपण अत्यंत कमी खर्चात एक घरगुती खास उपाय करु शकतो. या घरगुती स्वस्तात मस्त उपायामुळे काळीकुट्ट दिसणारी भांडी अगदी मिनिटभरात स्वच्छ होऊन पुन्हा नव्यासारखी दिसू लागतील. 

कढई, पॅन, तवा यांचे पृष्ठभाग दिसतात काळेकुट्ट... 

कढई, पॅन, तवा यांचे काळे झालेले पृष्ठभाग पुन्हा स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कपभर कोणतेही कोल्ड्रिंक, २ ते ३ टेबलस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून  बेकिंग सोडा, १ टेबलस्पून मीठ व २ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

हार, फुले फ्रिजशिवायही राहतील चांगली! ८ सोप्या ट्रिक्स - न कोमेजता टिकतील बरेच दिवस ताजी, टवटवीत... 

कुकरची गॅस्केट सैल झाली, पदार्थ नीट शिजत नाही? ७ ट्रिक्स - मिनिटभरात सैल झालेली गॅस्केट होईल दुरुस्त... 
 

उपाय काय आहे... 

एका मोठ्या भांड्यात कोल्ड्रिंक घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळा. शेवटी बेकिंग सोडा, मीठ आणि व्हिनेगर घालून चांगले मिसळा. तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाकल्यावर द्रावणात फेस येऊ लागेल. हे घरगुती क्लिनिंग लिक्विड बनवल्यानंतर तुम्ही ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि ती बॉटल किचन सिंकजवळच ठेवा. आता जेव्हा तुम्हाला कढई, पॅन, तवा यांसारखी काळीकुट्ट झालेली भांडी स्वच्छ करायची असतील, तेव्हा त्यावर हे द्रावण टाकून साधारण २० मिनिटांसाठी तसेच ठेवा, यामुळे भांडं घासून स्वच्छ करण्याची तुमची मेहनत कमी होईल.

मुलांच्या टिफीन बॉक्सला कुबट वास येतो? ३ ट्रिक्स, दुर्गंध जाईल काही मिनिटांत....

थोड्या वेळानंतर स्टीलच्या घासणीने किंवा कोणत्याही स्पंजच्या मदतीने भांडे घासायला सुरुवात करा. तुम्ही पाहाल की डाग खूप लवकर निघू लागतील. भांडे चांगले घासल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. या द्रावणाचा वापर तुम्ही कोणत्याही भांड्यावरील हट्टी डाग काढण्यासाठी, तसेच टाइल्सवरील डाग काढण्यासाठीही सहज करू शकता.

हा उपाय कसा फायदेशीर... 

कोल्ड्रिंकमध्ये कार्बोनिक आणि फॉस्फोरिक ॲसिड असते, जे हट्टी डाग आणि गंज काढायला मदत करते. बेकिंग सोडा आणि मीठ हे नैसर्गिक स्क्रबसारखे काम करतात, जे डाग घासून काढतात आणि पृष्ठभाग स्वच्छ करतात. त्याचप्रमाणे, लिंबू आणि व्हिनेगर हे आम्लयुक्त असतात, जे घाण आणि तेलकटपणा काढून भांड्यांना चमकदार बनवतात.


Web Title: Use cold drink to clean burnt kadhi pan kitchen hack clean burnt pan with cold drink how to clean burnt kadhi pan clean burnt kadai with cold drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.