Rat Home Remedy : घर असो दुकान असो वा गोदाम असो या ठिकाणांवर उंदरांचा हैदोस असतोच असतो. लोक उंदीर इतका धिंगाणा घालतात की, त्यांना कधी एकदाचं पकडून मारता येईल असा विचार लोकांच्या मनात येत असतो. कारण ते घरातील कपडे कुरडतात, दुकानातील बिलं कुरडतात, धान्य खातात आणि गोदामातील सुद्धा धान्याच्या पोत्यांना भोकं पाडून ठेवून धान्य खातात. म्हणजे जिकडे तिकडे केवळ नुकसानच नुकसान.
जर उंदरांनी आपल्या सुद्धा नाकी नऊ आणले असतील तर यावर केवळ 10 रूपये खर्चाचा एक उपाय आहे. हा उपाय करून आपण घरातील काय सगळीकडचे उंदीर पळवून लावू शकता. हा उपाय @Kailashyogastudiorishik या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
कैलाश योग स्टुडिओनुसार केळी कापा आणि त्यावर इनोची एक पॅकेट पावडर टाका. वरून थोडी हळद पावडर टाका. हे मिश्रण घरातील कोनाकोपऱ्यांमध्ये काही तासांसाठी ठेवा. हा उपाय करून घरातील सगळे उंदीर पळून जातील. इतकंच नाही तर या उपायानं डास आणि माश्याही पळून जातील.
तुरटीही एक चांगला पर्याय
कैलाश योग स्टुडिओचा उपाय चांगला आहेच. पण जर हा उपाय करायचा नसेल, वेगळा उपाय हवा असेल तर तुरटीचा वापर करू शकता. यासाठी तुरटी पाण्यात मिक्स करा. तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरा. जिथे जास्त उंदीर येतात, तिथे हे मिश्रण स्प्रे करा. याच्या गंधानं उंदीर घरातून पळून जातील.