Join us  

स्ट्रेच मार्क आहेत तर आहेत, एक जीव जन्माला घातलाय.. उर्वशी ढोलकिया म्हणते, त्यात लपवण्यासारखं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2022 6:04 PM

Viral Photoshoot of Urvashi Dholakia: अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून यात तिने तिचे स्ट्रेचमार्क दाखवत बॉडी पॉझिटीव्हीटीविषयी रोखठोक मत व्यक्त केलं आहे.

ठळक मुद्देस्ट्रेचमार्क्स लपविण्याचा अनेकींचा आटोकाट प्रयत्न असतो. पण असं असताना दुसरीकडे मात्र उर्वशीसारखी अभिनेत्री ते दाखवतेय आणि ते स्ट्रेचमार्क म्हणजे आपल्यासाठी 'असेट' आहे, असं स्पष्टपणे सांगतेय.

'कसौटी जिंदगी की' या लोकप्रिय मालिकेत 'कमोलिका'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया म्हणजे छोट्या पडद्यावरचं एक मोठं नाव. दिलखुलास व्यक्तिमत्त्वाची उर्वशी सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. उर्वशीने इन्स्टाग्रामवर नुकतेच तिचे बिकीनी लूकमधले काही फोटो शेअर केले असून त्यात तिचे स्ट्रेचमार्क्स (Stretch Marks) अगदी स्पष्टपणे दिसून येत आहेत. बाळंतपणानंतर शरीरावर येणारे स्ट्रेचमार्क्स हा अनेकींसाठी त्रासदायक विषय असतो. ते लपविण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न असतो. पण असं असताना दुसरीकडे उर्वशीसारखी अभिनेत्री मात्र ते दाखवतेय आणि ते स्ट्रेचमार्क म्हणजे आपल्यासाठी 'असेट' आहे, असं स्पष्टपणे सांगतेही आहे.

 

उर्वशीचं वयाच्या १६ व्या वर्षीच लग्न झालं. त्यानंतर लवकरच तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलांच्या जन्मानंतर काही वर्षांतच तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने सिंगल पॅरेंट बनून तिच्या मुलांना सांभाळलं आहे.

थंडीमुळे चेहरा काळवंडला? वापरा ३ डी-टॅन फेसपॅक, हिवाळ्यातही चेहरा दिसेल सुंदर- चमकदार

आज उर्वशीची ही दोन्ही मुलं टीन एजर्स आहेत. उर्वशीने इन्स्टाग्रामवर स्वत:चे जे फोटो शेअर केले आहेत, त्यात ती एका स्विमिंगपूलमध्ये असून निळ्या रंगाची बिकिनी तिने घातली आहे. या फोटोंसोबत तिने जी पोस्ट शेअर केली आहे, ती अतिशय बोलकी आहे.

 

यात उर्वशी म्हणतेय की महिला कशा दिसतात, कोणते कपडे घालतात, कशा वागतात या गोष्टींवरून आपल्याकडे फार आधीपासूनच त्यांना जज केले जाते. तुम्ही परफेक्ट असावं किंवा दिसावं यासाठी त्यांच्यावर खूप दबाव टाकला जातो, जो मी नेहमीच नाकारत आले आहे.

प्रोटीन पावडर कशाला खायच्या? खा ५ हेल्दी प्रोटीन रिच गोष्टी, मिळेल भरपूर एनर्जी

कारण मी असं मानते की एक स्त्री म्हणून मला काय पाहिजे ते कपडे घालण्याचा, मला जे हवं ते करण्याचा आणि मला जसं पाहिजे तसं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. माझी प्रतिष्ठा आणि माझा सन्मान या गोष्टी मी स्वत: मिळवलेल्या आहेत. आणि त्यासाठी मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.

तब्बू, सिर्फ नाम ही काफी है! वाचा तब्बूविषयी फारशा माहितीच नसलेल्या 8 गोष्टी

प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत आपलं शरीर बदलत जातं. आणि त्यामुळे शरिराच्या आकारांवरून, रचनांवरून कुणीही आपल्याला जज करू नये. स्त्री च्या शरीरातूनच एका नव्या आयुष्याची सुरुवात होते. आणि तेच माझं सगळ्यात मोठं 'ॲसेट' असून ते माझ्याकडे असण्याचा मला अतिशय आनंद आहे.  

 

टॅग्स :सोशल व्हायरलउर्वशी ढोलकिया