lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > थंडीमुळे चेहरा काळवंडला? वापरा ३ डी-टॅन फेसपॅक, हिवाळ्यातही चेहरा दिसेल सुंदर- चमकदार

थंडीमुळे चेहरा काळवंडला? वापरा ३ डी-टॅन फेसपॅक, हिवाळ्यातही चेहरा दिसेल सुंदर- चमकदार

Skin Care Tips For Winter: थंडीमुळे त्वचा काळवंडण्याचा त्रास होतोच.. म्हणूनच हा त्रास कमी करण्यासाठी हे काही हाेममेड डि-टॅन फेसपॅक (home made face pack) उपयुक्त ठरू शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 03:25 PM2022-11-04T15:25:01+5:302022-11-04T15:25:35+5:30

Skin Care Tips For Winter: थंडीमुळे त्वचा काळवंडण्याचा त्रास होतोच.. म्हणूनच हा त्रास कमी करण्यासाठी हे काही हाेममेड डि-टॅन फेसपॅक (home made face pack) उपयुक्त ठरू शकतात.

3 Best D-tan face pack for winter, How to keep skin glowing in winter? | थंडीमुळे चेहरा काळवंडला? वापरा ३ डी-टॅन फेसपॅक, हिवाळ्यातही चेहरा दिसेल सुंदर- चमकदार

थंडीमुळे चेहरा काळवंडला? वापरा ३ डी-टॅन फेसपॅक, हिवाळ्यातही चेहरा दिसेल सुंदर- चमकदार

Highlightsत्वचा तर उजळ होईलच, पण तिच्यावर छान ग्लो दिसू लागेल.

हिवाळा सुरू होताच त्वचेवर परिणाम दिसून यायला सुरुवात होते. त्वचा कोरडी पडते, काही जणांना तर अंगाला खूप खाज येते. चेहराही कोरडा- निस्तेज (home remedies for dry skin in winter) दिसू लागतो आणि काळवंडतो. उन्हामुळे जसं त्वचेवर टॅनिंग होऊन त्वचा काळी पडते, तसंच हिवाळ्यातही होतं. थंड- कोरड्या हवेमुळे त्वचेमधलं नैसर्गिक मॉईश्चरायझर कमी होतं आणि त्वचा कोरडी पडून काळवंडते. अशा काळवंडलेल्या त्वचेसाठी (how to remove tanning) आठवड्यातून एक- दोन वेळा यातील काही होममेड डि- टॅन फेसपॅक तुम्ही वापरू शकता. त्वचा तर उजळ होईलच, पण तिच्यावर छान ग्लो (home remedies for glowing skin) दिसू लागेल.

 

हिवाळ्यासाठी डि- टॅन फेसपॅक
१. टोमॅटो, दही आणि बेसन

टोमॅटमध्ये भरपूर प्रमाणात असणारे व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेसाठी पोषक ठरतात. मध्यम आकाराचा टोमॅटो किसून त्याचा रस काढून घ्या. त्यात १ टेबलस्पून दही आणि २ टेबलस्पून बेसन टाका.

प्रोटीन पावडर कशाला खायच्या? खा ५ हेल्दी प्रोटीन रिच गोष्टी, मिळेल भरपूर एनर्जी

हे मिश्रण व्यवस्थित कालवून चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा. २० ते २५ मिनिटे हा लेप चेहऱ्यावर तसाच राहू द्या. त्यानंतर चोळून काढा आणि चेहरा धुवून टाका. नंतर त्वचेला मॉईश्चरायझर लावा. 

 

२. मध आणि लिंबाचा रस
एक टेबलस्पून मध आणि एक टेबलस्पून लिंबाचा रस एका वाटीमध्ये घेऊन एकत्र करा. लिंबामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स तर मधामध्ये असणारे काही घटक त्वचेचा काळवंडलेपणा दूर करण्यासाठी मदत करतात.

तब्बू, सिर्फ नाम ही काफी है! वाचा तब्बूविषयी फारशा माहितीच नसलेल्या 8 गोष्टी

हा लेप चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर अर्ध्या तासाने चेहरा धुवून टाका. 

 

३. काकडी आणि मसूर डाळ
मसूर डाळीचं पीठ करून घ्या. २ टेबलस्पून मसूर डाळीच्या पिठात २ टेबलस्पून किसलेली काकडी टाका. त्यात चिमुटभर हळद घाला. हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा. साधारण १५ ते २० मिनिटांनी चोळून हे मिश्रण चेहऱ्यावरून काढून टाका आणि चेहरा धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्याला माॅईश्चराईज करा. 


 

Web Title: 3 Best D-tan face pack for winter, How to keep skin glowing in winter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.