Join us  

अरे हे काय? वर्गातच स्विमिंग पूल? उन्हाचा त्रास मुलांना होऊ नये म्हणून; शिक्षकांनी लढवली शक्कल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2024 5:13 PM

UP School Transformed Classroom Into Swimming Pool To Beat The Heat : शिक्षकांनी लढवली शक्कल, मुलांसाठी तयार केले जलतरण

उन्हाचे चटके बसल्यावर आपण बाहेर जाणं टाळतो (Summer Heat). सध्या सर्वत्र सूर्यप्रकाश आग ओकत आहे. ज्यामुळे लोकं हैराण झाले आहेत. फक्त मोठे व्यक्ती नसून, लहान मुलं देखील उन्हात जाणं टाळत आहे (Social Viral). तर मुलं भर उन्हात शाळेत जाण्यास टाळाटाळ करीत आहे (Viral Video). मुलं नियमित शाळेत यावे, कडक उन्हाचा त्रास मुलांना होऊ नये म्हणून, कन्नौजच्या शिक्षकांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे.

त्यांनी शाळेतच मुलांसाठी स्विमिंग पूल तयार केलं आहे. यासंबंधितचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, स्विमिंग पूलच्या पाण्यात मुलं मनसोक्त आनंद लुटत आहे(UP School Transformed Classroom Into Swimming Pool To Beat The Heat).

शिक्षकांनी लढवली शक्कल, मुलांसाठी तयार केले जलतरण

सध्या उन्हाचा पारा वाढत आहे. तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. उष्ण वाऱ्याच्या झुळूकांचाही लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे शाळकरी मुलांची उपस्थितीही कमी होत आहे. मुलांनी आवडीने शाळेत यावे म्हणून, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी अनोखी शक्कल लढवली आहे.

महाराष्ट्र दिन विशेष : 'नथ' म्हणजे मराठी साजशृंगार, नथीचे हे '३' डिझाइन्स हवेच तुमच्याकडे, पाहा नथीचा नखरा

शाळेचे मुख्याध्यापक वैभव राजपूत यांनी, शाळेच्या वर्गात पाणी भरून त्याचे जलतरण तलावात रूपांतर केले. शाळकरी मुलांनीही स्विमिंग पूलचा आनंद लुटला. या आयडियाबाबत मुख्याध्यापक म्हणाले. 'मुलांनी नियमित शाळेत यावे. मुख्य म्हणजे उन्हाचा त्रास होऊ नये, यासह अभ्याससोबत मनोरंजन व्हावे, म्हणून जलतरण तयार करण्याचं आम्ही ठरवलं.'

विकतचा कशाला? घरीच अचूक प्रमाणात करा 'गरम मसाला'; चव अशी की विकतचे मसाले ठरतील फेल

ते पुढे म्हणतात, 'उन्हाळ्याची सुट्टी जवळ आली आहे. गावात शेतीशी संबंधित कामे सुरू आहेत. अनेक मुले आपल्या कुटुंबियांना शेतात मदत करतात. त्यामुळे त्यांची शाळेतील उपस्थिती कमी होत आहे. त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, व त्यांना शाळेची ओढ लागावी म्हणून शाळेतच स्विमिंग पूल तयार करण्यात आले.'

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल