Join us

गॅस बर्नर अस्वच्छ-गॅस नीट पेटतही नाही? ‘या’ पद्धतीने करा स्वच्छ- स्वयंपाक होईल मस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:52 IST

Tricks To Clean Dirt Gas Stove : गॅस सिलेंडर किती वाया जाणार हे गॅस बर्नरच्या स्थितीवर अवलंबून असतं.

सिलेंडरच्या वाढत्या किमती घराच्या पूर्ण बजेटवर परीणाम करतात. प्रत्येकालाच वाटतं की सिलेंडर जास्त चालावं जेणेकरून खर्चाची बचत होईल. गॅस सिलेंडर किती वाया जाणार हे गॅस बर्नरच्या स्थितीवर अवलंबून असतं गॅस बर्नरचे छेद बंद होऊ  लागतात. त्यातून पिवळ्या ज्वाला बाहेर येतात. कारण बर्नरमध्ये धूळ, तेल आणि खाण्या-पिण्याचे पदार्थ आत शिरतात. ज्यामुळे गॅस व्यवस्थित चालत नाही. (Tricks To Clean Dirt Gas Stove)

गॅस पूर्णपणे सुरू न झाल्यामुळे जास्तवेळ गॅस सुरू ठेवावा लागतो. यामुळे फक्त सिलेंडर लवकर संपत नाही तर स्वंयपाक करायलाही वेळ लागतो आणि व्यवस्थित बनवत नाही. सुकन्या तिवारी यांनी ट्रिक्स शेअर केल्या आहेत. या ट्रिक्स तुमचं रोजचं काम अधिकच सोपं करतील. ( How To Save Gas Stove Easy Way To Clean Gas Stove)

बर्नर काढून टाका

सगळ्यात आधी गॅस शेगडीवरून बर्नर व्यवस्थित काढून घ्या. जेवण केल्यानंतर थोड्या वेळानं बर्नर काढून टाका. जेणेकरून पूर्णपणे थंड होईल. अन्यथा हात जळू शकतो. बर्नर हटवल्यानंतर  कोणतंही भांडं किंवा टबमध्ये ठेवा.

सणासुदीला पांढरे केस नको? नारळाच्या तेलात 'हा' पदार्थ कालवून लावा, ५ मिनिटांत केस काळेभोर

नंतर बर्नरवर गरम पाणी घाला. त्यात १ चमचा बेकिंग सोडा आणि एक पाकीट इनो घाला. हे दोन्ही पदार्थ मिसळून एक चांगलं लिक्विड तायर होईल ज्यामुळे गंजाचे डाग सहज निघण्यास मदत होईल. बेकींग सोडा घाण काढून टाकण्यास मदत करतो. ईनोमधिल सिट्रिक एसिड आणि सोडीयम बायकार्बोनेट मिसळून फेस तयार होतो. ज्यामुळे सफाईची प्रक्रिया चांगली होते.

 

आता या मिश्रणात एक लिंबू पिळा. लिंबात नैसर्गिक स्वरूपात सिट्रिक एसिड असते. जे साफ-सफाईसाठी फायदेशीर ठरते. लिंबाचा रस, बेकींग सोडा आणि इनो यांचा फेस काहीवेळ तसाच ठेवा. जेणेकरून हट्टी डाग निघून जातील. तुम्ही एखाद्या जुन्या टूथब्रश किंवा स्क्रब पॅडने बर्नर स्वच्छ करू शकता. ज्यामुळे कमी मेहनतीत बर्नर स्वच्छ होईल.

गौरी-गणपतीत हातात घाला सुंदर राजेशाही तोडे; १० नवीन डिजाईन्स, हाताला येईल शोभा

थोड्या वेळानं तुम्हाला दिसेल की बर्नरवर जमा झालेली घाण आपोआप स्वच्छ झाली आहे. आता एक जूना टुथब्रश किंवा स्क्रब पॅड घेऊन बर्नर हलक्या हातानं रगडा. तुम्हाला दिसेल की कमी मेहनतीत बर्नर पूर्ण साफ झालं आहे. शेवटी पाण्यानं स्वच्छ धुवून कापडानं पुसून घ्या. या उपायानं गॅस बर्गर स्वच्छ, चकचकीत दिसेल आणि गॅसही जास्तवेळ चालेल.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स