Lokmat Sakhi >Social Viral > ब्रेडचा छोटा तुकडा करेल घराची स्वच्छता! ब्रेड शिल्लक राहिला, फेकू नका - घराचा कानाकोपरा दिसेल लख्ख...

ब्रेडचा छोटा तुकडा करेल घराची स्वच्छता! ब्रेड शिल्लक राहिला, फेकू नका - घराचा कानाकोपरा दिसेल लख्ख...

Cleaning Hacks : Tips & Tricks How To Clean Stains & Dust From House With Bread : How To Clean House With Bread : Bread Isn’t Just for Eating: Here Are 5 Surprising Ways To Use It for Cleaning Your Home : How to Clean With Bread : ब्रेड स्लाइस शिल्लक राहिला तर फेकून न देता घराची साफसफाई कशी करायची ते पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2025 15:38 IST2025-05-31T15:13:44+5:302025-05-31T15:38:21+5:30

Cleaning Hacks : Tips & Tricks How To Clean Stains & Dust From House With Bread : How To Clean House With Bread : Bread Isn’t Just for Eating: Here Are 5 Surprising Ways To Use It for Cleaning Your Home : How to Clean With Bread : ब्रेड स्लाइस शिल्लक राहिला तर फेकून न देता घराची साफसफाई कशी करायची ते पाहा..

Tips & Tricks How To Clean Stains & Dust From House With Bread How To Clean House With Bread Here Are 5 Surprising Ways To Use It for Cleaning Your Home | ब्रेडचा छोटा तुकडा करेल घराची स्वच्छता! ब्रेड शिल्लक राहिला, फेकू नका - घराचा कानाकोपरा दिसेल लख्ख...

ब्रेडचा छोटा तुकडा करेल घराची स्वच्छता! ब्रेड शिल्लक राहिला, फेकू नका - घराचा कानाकोपरा दिसेल लख्ख...

आपण अनेकदा सकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेड विकत आणतो. ब्रेडचे अनेक पदार्थ तयार करून आपण त्यांवर ताव मारतोच. परंतु खाण्याव्यतिरिक्त (Cleaning Hacks) घराची साफसफाई करण्यासाठी देखील ब्रेडचा (Tips & Tricks How To Clean Stains & Dust From House With Bread) उपयोग होऊ शकतो, असा विचार पण आपल्या मनात आला नसेल. शक्यतो आपण ब्रेडचे पॅकेट आणले की काहीवेळा ते एकदम एकाचवेळी खाऊन संपत नाही, अशावेळी आपण उरलेला शिळा ब्रेड फेकूनच देतो(How To Clean  House With Bread).

परंतु हा उरलेला शिळा ब्रेड फेकून न देता आपण त्याचा वापर करून घरातील कानाकोपऱ्याची स्वच्छता अगदी झटपट करु शकतो. ब्रेडचा फक्त एका छोटा तुकडा वापरुन देखील आपण घरातील साफसफाई करून घर नव्यासारखे लख्ख करू शकतो. ब्रेडचा वापर करुन आपण घराची स्वच्छता कशी ठेवू शकतो, ते पाहूयात( Bread Isn’t Just for Eating: Here Are 5 Surprising Ways To Use It for Cleaning Your Home).

ब्रेडचा तुकडा करेल घराच्या कानाकोपऱ्यांची सफाई... 

१. खिडक्यांच्या काचा चमकतील :- खिडकीची काच असो किंवा फोटो फ्रेमची, त्यावर धूळ माती सोबतच अनेक प्रकारचे डाग दिसू लागतात. अशा डागांसाठी ब्रेड खूपच उपयुक्त ठरतो. ब्रेडचा मऊ पोत आणि त्यामध्ये असणारा स्टार्च काच स्वच्छ करण्यासाठी मदत करतो. मऊ ब्रेडचा एक तुकडा घ्या आणि हलक्या हाताने काचेवर चोळा. यामुळे काचेवरील डाग अगदी सहज निघतात आणि धूळ ब्रेड स्लाइसला चिकटते. इतकंच नाही, तर जर काच फुटली असेल तर ती उचलणं खूप धोकादायक असतं. झाडूने झाडलं तरी तिचे बारीक तुकडे पूर्णपणे गोळा करता येत नाहीत. अशावेळी एक जाडसर ब्रेडचा स्लाइस घ्या आणि जिथे काच फुटली आहे तिथे हलक्या हाताने दाबा. काचेचे बारीक तुकडे ब्रेडमध्ये चिकटून जातात आणि हाताला दुखापतही होत नाही.

पावसाळ्यात माशा, डास, कीटकांचा घरभर उच्छाद? पाहा प्लॅस्टिकची पिशवी व अ‍ॅल्युमिनियम फॉइलची सोपी व्हायरल ट्रिक...

२. धूळ होईल मिनिटांत गायब :- घरात कितीही झाडलोट केली तरी घराच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे धूळ दिसतेच. तुम्ही जर फक्त कपड्याने धूळ पुसत असाल, तर त्याऐवजी ब्रेड वापरून पाहा. काचेचे टेबल असो किंवा लाकडी सोफा यावर धूळ फार मोठ्या प्रमाणात असतेच, त्यासोबत डागही दिसू लागतात. अशावेळी ब्रेडने या वस्तूंची सफाई करा. ब्रेडमुळे धूळ काही मिनिटांत साफ होते आणि लाकडी वस्तूंवरील डागही कमी होतात. 

गॅस लायटरवरील चिकट, तेलकट, मेणचट डाग होतील गायब! फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये गॅस लायटर होईल स्वच्छ...

३. भिंतीवरचे पेन्सिल आणि क्रेयॉन्सचे डाग काढा :- घरात लहान मुलं असतील, तर भिंतीवर पेन्सिल किंवा क्रेयॉन्सने हमखास रंगरंगोटी करतात. मुलं अनेकदा भिंतींना रंगवतात आणि खेळात भिंतींवर काही ना काही चित्रं काढतात. पण पालकांसाठी हे भिंतींवरचे डाग घालवणे म्हणजे एक मोठी डोकेदुखी असते, कारण ते सहजासहजी निघत नाहीत. असे असले तरी हे डाग तुम्ही ब्रेडने पुसलेत, तर ते हळूहळू हलके पडू लागतात. विशेषतः भिंतीवर वॉलपेपर असेल, तरीही ब्रेडचा ताजा स्लाइस वापरून ते स्वच्छ करता येते.

प्रेशर कुकरचे रबर सैल झाले, वाफ बाहेर येते? सोपे ५ उपाय, एकदम चटकन करा दुरुस्त...

४. भांड्यांवरील चिकटपणा काढा :- रोजच्या वापरातील भांड्यांवर तेल व तुपामुळे चिकटपणा येतो, जो सहजासहजी धुतल्याने जात नाही. बरेचदा खूप घासल्यानंतरही भांडी चिकट, तेलकट, तुपकट वाटतात. अशावेळी ब्रेडचा वापर करुन आपण ही भांडी स्वच्छ करु शकतो. ब्रेड स्लाइस तेलाचा चिकटपणा  शोषून घेतात. ज्या भांड्यावर चिकटपणा आहे, त्या भागावर ब्रेडचा तुकडा चोळा. त्यामुळे चिकटपणा दूर होईल. इतकंच नव्हे तर, जर हाताला किंवा इतर कोणत्याही भागाला तेल किंवा तुपासारखे तेलकट पदार्थ लागले असतील तरीही ब्रेडचा स्लाइस चोळल्यास ते सहजपणे स्वच्छ होतं. 

५. फ्रिजमधील दुर्गंधही होईल दूर :- ब्रेडचे स्लाइस फक्त डाग आणि धूळच नाही, तर दुर्गंधही शोषून घेतात. जर फ्रिजमधून कुबट घाण दुर्गंधी येत असेल, तर एका शिळ्या ब्रेडच्या स्लाइसवर एसेंशियल ऑइलचे काही थेंब टाका आणि तो स्लाइस फ्रिजमध्ये ठेवा. हे एक नैसर्गिक एअर फ्रेशनरप्रमाणे काम करेल आणि काही तासांतच फ्रिजमधून कुबट दुर्गंधी जाऊन सुगंध येऊ लागेल.

Web Title: Tips & Tricks How To Clean Stains & Dust From House With Bread How To Clean House With Bread Here Are 5 Surprising Ways To Use It for Cleaning Your Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.