Lokmat Sakhi >Social Viral > किचन सिंक सतत तुंबते? मूठभर हिरवीगार पानं करतील सिंक मोकळं - पाणी वाहून जाईल सेकंदात...

किचन सिंक सतत तुंबते? मूठभर हिरवीगार पानं करतील सिंक मोकळं - पाणी वाहून जाईल सेकंदात...

4 Easy & Quick Ways To Unclog Your Kitchen Sink : How To Unclog Kitchen Sink : Tips & Tricks How To Clean Blocked Kitchen Sink In Minutes : किचन सिंक वारंवार तुंबते, वैताग आलाय - यासाठी काही खास उपाय ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 20:43 IST2025-04-15T20:30:43+5:302025-04-15T20:43:47+5:30

4 Easy & Quick Ways To Unclog Your Kitchen Sink : How To Unclog Kitchen Sink : Tips & Tricks How To Clean Blocked Kitchen Sink In Minutes : किचन सिंक वारंवार तुंबते, वैताग आलाय - यासाठी काही खास उपाय ...

Tips & Tricks How To Clean Blocked Kitchen Sink In Minutes 4 Easy & Quick Ways To Unclog Your Kitchen Sink How To Unclog Kitchen Sink | किचन सिंक सतत तुंबते? मूठभर हिरवीगार पानं करतील सिंक मोकळं - पाणी वाहून जाईल सेकंदात...

किचन सिंक सतत तुंबते? मूठभर हिरवीगार पानं करतील सिंक मोकळं - पाणी वाहून जाईल सेकंदात...

स्वयंपाक घरातलं सिंक म्हणजे अशी जागा जिथे किचनमधील बहुतेक स्वच्छतेची सगळीच काम केली जातात. फळं, भाज्या, धान्य असं काय- काय आपण तिथे धूत असतो. त्यामुळे मग बऱ्याचदा (4 Easy & Quick Ways To Unclog Your Kitchen Sink) त्यात काही अन्नाचे कण अडकतात. पाईप आतल्या बाजुने व्यवस्थित (How To Unclog Kitchen Sink) स्वच्छ झाला नाही तर मग हळूहळू पाण्याचा निचरा कमी वेगात होऊ लागतो आणि मग शेवटी पाणी जातच नाही. त्यामुळे मग सिंक तुंबून जातं( Tips & Tricks How To Clean Blocked Kitchen Sink In Minutes).

ऐन गडबडीत असं काही झालं तर डोक्याला ताप होतोच, शिवाय सिंकमध्ये साचलेलं पाणी कसं काढायचं असा प्रश्न पडतो. अशा घाई गडबडीच्या वेळी काहीवेळा प्लंबरला बोलावण्याइतका वेळ देखील नसतो. त्यामुळेच मग अशावेळी तातडीने हे काही उपाय करून पाहा. यामुळे सिंक मोकळं होऊन पाणी वाहून जाण्यास  मदत होईल.   
 
किचन सिंक वारंवार तुंबते तर काय करावे ? 

१. पुदिन्याची पाने आणि गरम पाणी :- सतत किचन सिंकमध्ये पाणी तुंबत असेल तर मूठभर पुदिन्याची पाने आणि गरम पाण्याचा खास उपाय करुन पाहा. मूठभर पुदीन्याची पाने सिंकच्या पाईपलाइनमध्ये घाला. त्यानंतर ३० मिनिटे किंवा तासाभराने यावर गरम पाणी ओता. यामुळे किचन सिंक पुन्हा कधीच तुंबणार नाही. पुदिन्याच्या पानांत असणारे इसेसन्शियल ऑईल आणि गरम पाणी पाइपमध्ये साचलेली चिकट घाण काढून, पाईप मोकळं करतात यामुळे पाणी काही सेकंदातच वाहून जाते.  

खरबुजाच्या बिया फेकून नुकसान करु नका, करा १० मिनिटांत खरबूज बियांचे मिल्कशेक! उन्हाळा गारेगार...

२. स्क्रबिंग पावडर आणि व्हिनेगर :- २ टेबलस्पून स्क्रबिंग पावडर किचन सिंकच्या पाईपमध्ये घालावी. त्यानंतर थोडे व्हिनेगर देखील पाईपमध्ये ओतावे. आता अर्ध्या तासानंतर सिंकमध्ये गरम पाणी ओतावे. या उपायामुळे सिंकमध्ये वारंवार पाणी साचत नाही. 

३. हाइड्रोजन पॅरोक्साइड आणि बेकिंग सोडा :- एका मोठ्या बाऊलमध्ये ३ टेबलस्पून बेकिंग सोडा आणि हाइड्रोजन पॅरोक्साइड घालून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट संपूर्ण सिंकमध्ये ओतून सिंक घासून घ्यावे. त्यानंतर सिंकमध्ये हे मिश्रण अर्ध्या तासासाठी तसेच ठेवून द्यावे. मग गरम पाणी ओतून सिंक स्वच्छ धुवून घ्यावे. यामुळे सिंक स्वच्छ होण्यासोबतच पाणी देखील तुंबणे थांबते. 

एक्सपायरी डेट उलटून गेलेले ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरताय ? तारीख बघा, मेकअपच्या दुखण्यावर गाठावा लागेल डाॅक्टर...

४. इनो आणि गरम पाणी :- सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये इनो पावडर घेऊन त्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट सिंकमध्ये ओतावी. त्यानंतर अर्ध्या तासाने सिंकमध्ये व्हिनेगर ओतावे आणि १० मिनिटे तसेच ठेवून द्यावे. मग सिंकमध्ये गरम पाणी ओतून सिंक स्वच्छ धुवून घ्यावे. या उपायामुळे सिंकमध्ये पाणी तुंबणार नाही.   
 

Web Title: Tips & Tricks How To Clean Blocked Kitchen Sink In Minutes 4 Easy & Quick Ways To Unclog Your Kitchen Sink How To Unclog Kitchen Sink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.