आपल्यापैकी बरेचजण दररोज न चुकता पायांची काळजी घेण्यासाठी सॉक्स वापरतात. पांढरेशुभ्र दिसणारे सॉक्स आपण रोज वापरत असल्याने ते लगेच काळे आणि (tips and tricks to clean dirty white socks) खराब दिसू लागतात. विशेषतः पांढरे सॉक्स (how to clean white socks without scrubbing) स्वच्छ ठेवणे मोठे कठीण असते, कारण त्यावर डाग लवकर दिसतात आणि ते सहजासहजी निघत नाहीत. दररोज वापरले जाणारे पांढरे पायमोजे सतत धूळ, माती आणि घर्षणामुळे पटकन काळेकुट्ट होतात. पांढऱ्याशुभ्र सॉक्सवरील काळेकुट्ट डाग सहज पाण्याने फक्त एका धुण्यात जात नाहीत(best way to clean stained white socks).
सॉक्स घासून-घासून हात दुखले तरीही ते जसेच्या तसेच काळे राहतात. सॉक्सवरील मुख्यतः तळव्यांकडील काळे, हट्टी डाग फक्त साबण किंवा डिटर्जंट वापरुन स्वच्छ होत नाहीत. यासाठी, सॉक्सवरील काळेकुट्ट डाग स्वच्छ करण्यासाठी काही खास घरगुती ट्रीक्सचा वापर करु शकतो. सोप्या घरगुती ट्रिक्स वापरून आपण हे पांढरेशुभ्र सॉक्स पुन्हा एकदम नव्यासारखे चमकदार व पांढरेशुभ्र करू शकतो. काळेकुट्ट झालेले सॉक्स स्वच्छ आणि नव्यासारखे पांढरेशुभ्र करण्यासाठी ची भन्नाट ट्रिक पाहूयात..
काळेकुट्ट सॉक्स स्वच्छ करण्याचे सोपे उपाय...
पांढरे सॉक्स काही दिवसांतच तळव्यांच्या बाजूने काळे झाले असतील आणि हे हट्टी डाग पूर्णपणे निघत नसतील, तर तुम्ही बेकिंग सोड्याचा हा उपाय नक्की वापरून पाहा.एका बादलीत ५०० मिली गरम पाणी घ्या. त्यात १ चमचा मीठ, १ चमचा व्हाइट व्हिनेगर, १ चमचा लिक्विड डिटर्जंट आणि १ मोठा चमचा बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करा. जेव्हा तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र कराल, तेव्हा त्यांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे फेस तयार होईल. आता या तयार मिश्रणात काळेकुट्ट झालेले सॉक्स किमान दोन तास भिजत ठेवून द्यावेत. त्यानंतर, सॉक्स पाण्यातून काढून स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्या. आपण फरक पाहू शकता की, खराब झालेले पांढरे सॉक्स पुन्हा एकदा नव्यासारखे स्वच्छ आणि पांढरेशुभ्र दिसू लागतील.
तेलाची किटली चिकट - तेलकट झाली ? सोपे ३ उपाय - न घासताच किटली होईल स्वच्छ नव्यासारखी...
ना माती, ना कुंडी, ग्लासभर पाण्यात लावा आलं घरच्याघरीच! ताजं औषधी आलं चहात घाला मस्त...
या इतर ट्रिकही आहेत फायदेशीर...
१. एका बादलीत गरम पाणी घ्या. त्यात एका लिंबाचा रस आणि एक चमचा मीठ घाला. या पाण्यांत सॉक्स बुडवून अर्धा तास ठेवा. नंतर हाताने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. सॉक्स नव्यासारखे स्वच्छ दिसू लागतील.
२. ब्लीचचा वापर करूनही आपण काळे झालेले सॉक्स स्वच्छ करू शकता. बादलीत थोडे गरम पाणी घ्या. त्यात २ ते ३ चमचे ब्लीच आणि एक चमचा भांडी घासण्याचा साबण (डिश सोप) घालून मिक्स करा. आता यामध्ये खराब झालेले सॉक्स घालून अर्धा तास भिजत ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.