Lokmat Sakhi >Social Viral > लसूण पाकळ्या ठेचून रात्रभर टॉयलेट सीटवर ठेवल्या तर..? दुर्गंधी कमी करण्याचा ‘असा’ही एक उपाय...

लसूण पाकळ्या ठेचून रात्रभर टॉयलेट सीटवर ठेवल्या तर..? दुर्गंधी कमी करण्याचा ‘असा’ही एक उपाय...

tips and tricks how to clean toilet seat with garlic essence : garlic toilet cleaning hacks : natural toilet cleaner garlic : how to clean toilet seat with garlic : garlic essence for bathroom cleaning : chemical free toilet cleaning tips : अस्वच्छ कमोड आणि टॉयलेट सीट वापरणे नकोसे वाटते तेव्हा करा हा खास देसी उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2025 10:05 IST2025-08-06T10:00:00+5:302025-08-06T10:05:02+5:30

tips and tricks how to clean toilet seat with garlic essence : garlic toilet cleaning hacks : natural toilet cleaner garlic : how to clean toilet seat with garlic : garlic essence for bathroom cleaning : chemical free toilet cleaning tips : अस्वच्छ कमोड आणि टॉयलेट सीट वापरणे नकोसे वाटते तेव्हा करा हा खास देसी उपाय...

tips and tricks how to clean toilet seat with garlic essence garlic toilet cleaning hacks garlic essence for bathroom cleaning how to clean toilet seat with garlic garlic essence for bathroom cleaning | लसूण पाकळ्या ठेचून रात्रभर टॉयलेट सीटवर ठेवल्या तर..? दुर्गंधी कमी करण्याचा ‘असा’ही एक उपाय...

लसूण पाकळ्या ठेचून रात्रभर टॉयलेट सीटवर ठेवल्या तर..? दुर्गंधी कमी करण्याचा ‘असा’ही एक उपाय...

आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या टॉयलेटमध्ये पांढराशुभ्र कमोड असतोच. हा पांढराशुभ्र कमोड आणि टॉयलेट सीट नेहमीच स्वच्छ ठेवणे फार कठीण काम असते. घरातील टॉयलेट आणि कमोडची स्वच्छता राखणे (tips and tricks how to clean toilet seat with garlic essence) ही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. टॉयलेट आणि कमोडच्या ( garlic toilet cleaning hacks) दिवसभरात होणाऱ्या वारंवार वापराने ते अस्वच्छ आणि खराब होऊन जाते. असे कमोड आणि टॉयलेट सीट वेळीच योग्य ती काळजी घेऊन सफाई केली नाही, तर त्यावर काळे - पिवळे डाग पडतात. टॉयलेट सीटवर एकदा का असे (garlic essence for bathroom cleaning) डाग पडू लागले की, मग कितीही कष्ट करुन स्वच्छ केले तरी असे हट्टी डाग निघता निघत नाहीत. पांढऱ्याशुभ्र कमोड आणि टॉयलेट सीटवर पडलेले पिवळे डाग फारच अस्वच्छ दिसतात. अशा परिस्थितीत, कमी खर्चिक आणि नैसर्गिक असा एक उत्तम उपाय (how to clean toilet seat with garlic) म्हणजे लसूण पाकळ्या. लसूण हा केवळ जेवणाची चव वाढवणारा पदार्थ नाही, तर तो एक शक्तिशाली नैसर्गिक जंतुनाशक देखील आहे.

लसूण पाकळ्यांमध्ये असलेले 'अँटी-बॅक्टेरियल' आणि 'अँटी-फंगल' गुणधर्म कमोड व टॉयलेट सीटवरील जंतू आणि दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात. या उपायामुळे टॉयलेट सीट व कमोड स्वच्छ आणि निर्जंतुक राहते. कमोड आणि टॉयलेट सीट स्वच्छ करण्यासाठी लसूण पाकळ्यांचा वापर नेमका कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत, ते पाहूयात... 

लसूण दूर करतो टॉयलेटमधील दुर्गंधी... 

लसूण पाकळ्यांमध्ये 'अ‍ॅलिसिन' नावाचे एक संयुग असते, जे लसणाला त्याचा विशिष्ट उग्र असा वास देते. हा 'अ‍ॅलिसिन' घटक टॉयलेट सीट व कमोड वरील  बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन नष्ट करतो. लसूणचे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म टॉयलेट किंवा बाथरूम स्वच्छ ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. त्यामुळे टॉयलेटमध्ये निर्माण होणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी लसूण अत्यंत उपयुक्त ठरतो. 

रिसर्चचा दावा-व्यायाम केल्यानं कमी होतो कॅन्सरचा धोका, पण पाहा नेमका कोणता व्यायाम करायचा...

१. लसणाच्या पाकळ्या टॉयलेट सीटवर ठेवल्याने नेमकं होत काय... 

रात्री झोपण्यापूर्वी ३ ते ४ लसूण पाकळ्या चिरून किंवा किंचित ठेचून टॉयलेट सीटवर व्यवस्थित पसरवून ठेवा. रात्री या भागाचा वापर कमी होत असल्यामुळे लसूण पाकळ्यांमधील अ‍ॅण्टिबॅक्टेरियल गुण अधिक प्रभावीपणे काम करतात. सकाळी उठल्यानंतर सीटला पाण्याने स्वच्छ धुवा. या उपायामुळे सीटवरील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात आणि टॉयलेट स्वच्छ व दुर्गंधीरहित राहते.

सणावाराला पुऱ्या करता पण बेत फसतो? तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्यांसाठी 'असं' पीठ मळा...

२. लसूण पाकळ्यांचे लिक्विड करण्याची ट्रिक... 

एका भांड्यात एक कप पाणी उकळा. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर त्यात २ ते ४ लसूण पाकळ्या बारीक चिरून किंवा किसून घालाव्यात. हे मिश्रण थोडा वेळ गार होऊ द्यावे, त्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या आणि टॉयलेट सीटवर स्प्रे करा. हवं असेल तर पाण्यात आपण थोडासा लसूण पाकळ्यांचा रसही मिसळू शकता. लसूणचा हा नैसर्गिक अर्क अ‍ॅण्टिबॅक्टेरियल असतो आणि त्यामुळे सीटवरील जीवाणू नष्ट होतात, दुर्गंधी दूर होते आणि टॉयलेट स्वच्छ राहते.

तुम्ही डाव्या कुशीवर झोपता की उजव्या? झोपेची पोझिशन सांगते तुमचा स्वभाव आणि आरोग्याचीही स्थिती...

लसूण पाकळ्यांच्या मदतीने टॉयलेट स्वच्छ करण्याचा हा घरगुती आणि नैसर्गिक उपाय एकदा नक्की करून बघा. आठवड्यातून दोन वेळा या पद्धतीने लसूणाचा वापर केल्यास कमोड व टॉयलेट सीटवरील बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट होतात आणि पिवळे डागही दूर होतात. यामुळे रासायनिक क्लिनरचा वापर टाळता येतो, ज्याचा आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. त्यामुळे लसूणाचा हा नैसर्गिक जीवाणूनाशक उपाय केमिकल-फ्री आणि हेल्दी पर्याय ठरतो.

Web Title: tips and tricks how to clean toilet seat with garlic essence garlic toilet cleaning hacks garlic essence for bathroom cleaning how to clean toilet seat with garlic garlic essence for bathroom cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.