पावसाळ्याच्या दिवसांत घरात झुरळं येण्याची समस्या खूपच कॉमन झाली आहे. स्वंयपाकघर असो किंवा बाथरूम, छोटे छोटे कीटक नेहमीच घरात घाण पसरवत असतात. हे किटक अनेक महागडे स्प्रे वापरूनही जात नाहीत. काही घरगुती उपाय करून तु्म्ही झुरळांना कायमचं दूर पळवू शकता. (Tips And Tricks Bay Leaf Remedy To Get Rid Of Cockroaches Naturally Chemical Free)
घरातून झुरळांना दूर पळवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. जे प्रत्येक स्वंयपाकघरात उपलब्ध असतात. तमालपत्र खाल्ल्यानं फक्त अन्नाची चव वाढत नाही तर यात नैसर्गिक सुगंधही असतो. तमालपत्राच्या वासानं झुरळं, किडे दूर पळून जातात. काही घरगुती उपाय करून तुम्ही झुरळांना कायमचं पळवून लावू शकता. (Tips And Tricks Bay Leaf Remedy)
तमालपत्र कुठे ठेवावे?
स्वंयपाकघर, किचन सिंक किंवा स्टोअर रूम अशा ठिकाणी झुरळं जास्त येतात तिथे तुम्ही तमालपत्र ठेवू शकता. सुकलेलं तमालपत्र वाटून त्याची पावडर बनवून घ्या. ही पावडर अशा ठिकाणी शिंपडा जिथून झुरळं येतात. तेजपत्ता पाण्यात उकळवण्यासाठी ठेवा हे पाणी थंड झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडा. ज्यामुळे झुरळं लांब पळतील आणि घरात सुगंधही येईल.तमालपत्रात नैसर्गिक तेल आणि सुगंधित तत्व असतात जी झुरळांना पळवून लावतात ज्यामुळे झुरळं जास्त टिकून राहत नाहीत. यात केमिकल्सचा वापर केला जात नाही. त्यामुळे लहान मुलं किंवा पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास काहीही त्रास नाही.
किती दिवसांत परीणाम दिसेल?
तमालपत्राचा परिणाम लगेच दिसून येत नाही. झुरळांना याचा तीव्र वास आवडत नाही आणि ते तिथून पळू लागतात. जर तुम्ही सतत काही आठवडे याचा वापर केला तर झुरळं घरातून दूर पळून जातील. तमालपत्र फक्त झुरळांना दूर पळवत नाही तर मुंग्या आणि इतर किड्यांनाही लांब ठेवते. तमालपत्र नियमित अंतरानं बदलत राहा कारण वेळेसह याची सुगंध कमी होतो. झुरळं जास्त येत असतील तर पावडरच्या स्वरूपात याचा वापर करा. जास्त मॉईश्चर असलेल्या जागी ठेवल्यास जास्तवेळ याचा परीणाम राहील.