Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > कपडे धुताना-वाळत घालताना होणारी ‘ही’ १ चूक महागात पडते, चार धुण्यात कपडे दिसतात जुने

कपडे धुताना-वाळत घालताना होणारी ‘ही’ १ चूक महागात पडते, चार धुण्यात कपडे दिसतात जुने

This one mistake while washing and drying clothes can be costly, clothes look old after four washes only, cleaning tips : कपडे धुताना घ्या काळजी म्हणजे टिकतात जास्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 14:13 IST2026-04-09T14:11:29+5:302026-04-09T14:13:30+5:30

This one mistake while washing and drying clothes can be costly, clothes look old after four washes only, cleaning tips : कपडे धुताना घ्या काळजी म्हणजे टिकतात जास्त.

This one mistake while washing and drying clothes can be costly, clothes look old after four washes only, cleaning tips | कपडे धुताना-वाळत घालताना होणारी ‘ही’ १ चूक महागात पडते, चार धुण्यात कपडे दिसतात जुने

कपडे धुताना-वाळत घालताना होणारी ‘ही’ १ चूक महागात पडते, चार धुण्यात कपडे दिसतात जुने

कपडे स्वच्छ, नीटनेटके आणि टिकाऊ राहावेत असं प्रत्येकालाच वाटतं. पण अनेकदा आपण कितीही काळजी घेतली तरी कपड्यांवर लालसर डाग पडणे, अचानक भोकं पडणे किंवा कापड लवकर झिजणे अशा समस्या समोर येतात. (This one mistake while washing and drying clothes can be costly, clothes look old after four washes only, cleaning tips )यासाठी केवळ कपड्यांची गुणवत्ता कारणीभूत नसते, तर आपल्या दैनंदिन सवयी आणि धुण्याच्या पद्धतीतल्या छोट्या चुका देखील तितक्याच जबाबदार असतात.

कपड्यांवर दिसणारे लालसर किंवा तपकिरी डाग बहुतेक वेळा घाम, डिओडरंट आणि शरीरातील रसायनांच्या प्रतिक्रियेमुळे तयार होतात. विशेषतः बगलेत असे डाग जास्त दिसतात. काही वेळा डिटर्जंट व्यवस्थित निघाला नाही किंवा कपडे नीट स्वच्छ धुतले गेले नाहीत तरीही डाग बसतात. तसेच हार्ड वॉटरमुळे कपड्यांवर गंजासारखे डाग दिसू शकतात, ज्यामुळे कपड्यांचा रंग खराब होतो.

कपड्यांना भोकं पडण्यामागेही अनेक कारणं असतात. कपाटात ठेवलेल्या कपड्यांमध्ये किडे शिरतात, विशेषतः मॉथ, कापडाचे तंतू खातात आणि त्यामुळे लहान भोकं तयार होतात. त्याचबरोबर वॉशिंग मशीनमध्ये कपडे जास्त फिरवणे, झिप किंवा हुक असलेल्या कपड्यांसोबत नाजूक कपडे धुणे यामुळेही कापडाला इजा होते. दैनंदिन वापरात बेल्ट, बॅग किंवा टेबलच्या कडांमुळे होणारा घर्षणही कपड्यांना हळूहळू कमकुवत करुन भोकं पडण्यास कारणीभूत ठरते.

कापड लवकर झिजण्यामागेही आपल्याच काही सवयी कारणीभूत असतात. जास्त प्रमाणात डिटर्जंट वापरणे, वारंवार गरम पाण्यात कपडे धुणे किंवा खूप वेळ कडक उन्हात वाळवणे यामुळे कापडाचे तंतू कमकुवत होतात. तसेच रोज एकच कपडा वापरणे किंवा कपड्यांची योग्य काळजी न घेणे यामुळेही त्यांचे आयुष्य कमी होते.

या सगळ्या समस्या टाळण्यासाठी काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जास्त डिटर्जंट वापरण्याचा मोह टाळावा, कारण त्यामुळे कपडे अधिक स्वच्छ न होता उलट खराब होतात. कपडे त्यांच्या प्रकारानुसार वेगळे धुतल्यास घर्षण कमी होऊन कापड सुरक्षित राहतं. घामाचे कपडे जास्त वेळ तसेच ठेवू नयेत, कारण त्यामुळे डाग पक्के बसतात. तसेच खूप गरम पाण्याचा वापर टाळावा आणि वॉशिंग मशीनमध्ये जास्त कपडे एकाच वेळी भरू नयेत. झिप आणि हुक बंद करूनच कपडे धुतल्यास इतर कपड्यांचे नुकसान टाळता येते. कपडे वाळवताना देखील खूप कडक उन्हापेक्षा जरा कमी उन्हात वाळवणं अधिक योग्य ठरतं.
 

Web Title : कपड़े धोने की गलती: नुकसान, फीकापन और छेद का कारण बनती है।

Web Summary : कपड़े धोने की महंगी गलतियों से बचें! पसीना, कठोर पानी और कठोर डिटर्जेंट कपड़ों को नुकसान पहुंचाते हैं। छाँटें, धीरे से धोएं और लंबे समय तक पहनने के लिए हवा में सुखाएं।

Web Title : Washing clothes mistake: Causes damage, fading, and holes quickly.

Web Summary : Avoid costly laundry mistakes! Sweat, hard water, and harsh detergents damage clothes. Sort, wash gently, and air dry for lasting wear.