Join us

१० वर्षांच्या मुलीने केली ५० देशांची सफर, एकही दिवस बुडवली नाही शाळा, हे घडलं कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2023 17:47 IST

This 10-year-old girl has been to 50 countries and not missed a single day of school भारतीय वंशाच्या १० वर्षांच्या मुलीने केली ५० देशांची भ्रमंती, हे शक्य कसं झालं?

भ्रमंती करायला प्रत्येकाला आवडते. काहींना नवीन जागा बघायला - फिरायला आवडते. कित्येकांचे जग फिरण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकं खूप प्रयत्न करत असतात. काही लोकांचे पैसे जमवण्यात वय निघून जाते. ज्यामुळे लोकं रिटायर झाल्यानंतर जग फिरण्याचं स्वप्न पूर्ण करतात.

मात्र, हे स्वप्न एका चिमुकलीने १० वर्षांच्या आत पूर्ण केले. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य झालं? पण होय, एका चिमुकलीने वयाच्या १० व्या वर्षी ५० देशांची सफर पूर्ण केली आहे. ते ही शाळेचा एकही दिवस न बुडवता, तिने ५० देशांची भ्रमंती पूर्ण केली. पण ही अशक्य वाटणारी सफर चिमुकलीने पूर्ण केली तरी कशी?(This 10-year-old girl has been to 50 countries and not missed a single day of school).

याहू लाइफ यूके या वेबसाईटनुसार, १० वर्षांच्या चिमुकलीचे नाव अदिती त्रिपाठी असे आहे. ती वडील दीपक आणि आई अविलाशासह साऊथ लंडनमध्ये राहते. तिने जवळपास संपूर्ण युरोप पाहिला आहे. एवढंच नाही तर तिने नेपाळ, सिंगापूर आणि थायलंड सारख्या ठिकाणांना देखील भेट दिली आहे.

‘हॅपी पिरिएड्स’ म्हणत वडिलांनी सेलिब्रेट केलं लेकीचं मोठं होणं, व्हायरल पोस्ट

अदितीच्या पालकांनी हे सर्व घडवून आणले

अदितीच्या आई वडिलांनुसार, ''अदिती एक उत्तम ट्रव्हलर व्हावी असे वाटते. तिने शालेय अभ्यासाचे नुकसान न करता, जग पाहावे. यासह विविध संस्कृती, खाद्य पदार्थ आणि लोकांना समजून घ्यावे. त्यासाठी आम्ही एक प्लॅन आखला. व त्यानुसार शालेय सुट्ट्यांमध्ये प्रवास करण्यास सुरुवात केली. बँकेच्या सुट्ट्यांचा वापर देखील आम्ही फिरण्यासाठी करतो. प्रवासावर दरवर्षी २०,००० पाऊंड ( २० लाख रुपयांपेक्षा जास्त ) खर्च होतो. पण या पैश्यांचा पुरेपूर वापर होतो.''

एकही दिवस न बुडवता प्रवास कसा पूर्ण केला?

अदितीचे वडील दीपक त्रिपाठी सांगतात, ''आम्ही अदितीला शुक्रवारी थेट शाळेतून घेऊन जायचो, व रविवारी रात्री उशिरा ११ च्या सुमारास विमानाने परत घरी यायचो. कधीकधी सोमवारी सकाळी पोहचायचो, त्यामुळे आम्ही थेट अदितीला विमानतळावरून शाळेत सोडायचो.''

जेवलीस का? J1 झाले का विचारणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिला रट्टा, पोस्ट व्हायरल

अदितीचे पालक अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. ते वर्षभर त्यांच्या सहलींसाठी बचत करतात. ते बाहेर खाणे टाळतात, सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात, स्वतःची कार नाही. अदिती व तिची २ वर्षांची बहीण अद्विता या मुलांचे संगोपनाचा खर्च वाचवण्यासाठी ते घरातूनही काम करतात.

तीन वर्षांची असल्यापासून करते प्रवास

याहू लाइफ यूकेला माहिती देताना अदिती सांगते, ''तीन वर्षांची असताना माझी सर्वात पहिली सफर जर्मनीत झाली. त्यानंतर मला नेपाळ जॉर्जिया, आर्मेनिया हे ठिकाण आवडले. नेपाळ माझ्या आवडीच्या ठिकाणांपैकी एक आहे, कारण तिथे मी घोडेस्वारी केली होती. तिथे मी सर्वात उंच केबल कारवर चालले होते आणि माऊंट एवरेस्ट देखील पाहिला होता. माझ्याकडे जगभरातील मजेशीर आठवणी आहेत. मी इतर मुलांना देखील विविध ठिकाणी जाण्याचा सल्ला देईन.''

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल