Lokmat Sakhi >Social Viral > पैठणीची शोभा काही औरच! भारतातील सर्वात सुंदर महाराणींनी नेसली १०० वर्षे जुनी साडी

पैठणीची शोभा काही औरच! भारतातील सर्वात सुंदर महाराणींनी नेसली १०० वर्षे जुनी साडी

The most beautiful queens of India wore a 100-year-old saree : महाराणींच्या नऊवारी समोर सगळंच फिकं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2025 20:13 IST2025-01-28T20:09:48+5:302025-01-28T20:13:26+5:30

The most beautiful queens of India wore a 100-year-old saree : महाराणींच्या नऊवारी समोर सगळंच फिकं.

The most beautiful queens of India wore a 100-year-old saree | पैठणीची शोभा काही औरच! भारतातील सर्वात सुंदर महाराणींनी नेसली १०० वर्षे जुनी साडी

पैठणीची शोभा काही औरच! भारतातील सर्वात सुंदर महाराणींनी नेसली १०० वर्षे जुनी साडी

पूर्वीसारखी घराणे शाही जरी आता उरली नसली तरी, शाही घराणी आजही टिकून आहेत. भारतात अनेक अशी घराणी आहेत. (The most beautiful queens of India wore a 100-year-old saree)या घराण्यांकडे सत्ता जरी उरली नसली तरी, संपत्ती आणि परंपरा आजही ते राखून आहेत. संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही. तर वर्षानुवर्षे चालत आलेल्या रीती आणि शाही ठेवणी. जसं की हत्यारे, दागिने , आणि पोशाख. (The most beautiful queens of India wore a 100-year-old saree) 

जुन्या वाड्यांमध्ये घराण्यातील लोकांचे पोशाख जतन करून संग्रहालयात ठेवलेले आपण पाहतोच.(The most beautiful queens of India wore a 100-year-old saree) पैठणीला एक स्त्री अमूल्य ठेवा मानते. पारंपारिक पैठणी हा घराण्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. जेवढी जुनी तेवढी तिची शान जास्त. महिला जेव्हा पैठणी नेसतात, तेव्हा फक्त वस्त्र म्हणून नेसत नाहीत. नऊवारी पैठणीला मोठा इतिहास लाभला आहे. नऊवारी हा नुसती साडीचा प्रकार नसून, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक मुल्यांपैकी एक आहे. साध्या घरांमध्येही आजीकडून आईला, आईकडून सुनेला घरातल्या जुन्या ठेवणीच्या साड्या दिल्या जातात. सध्या चर्चा आहे ती, बडोद्याच्या गायकवाड घराण्यातील सोन्याच्या पदराच्या पैठणीची.     

बडोद्याच्या महाराणी राधिकाराजे गायकवाड यांच्या  नऊवारी पैठणीने लोकांचे डोळेच दिपवले आहेत. सब्यासाची मुखर्जी या नामांकित डिझायनरच्या २५व्या वर्धापन दिन सोहळ्यात महाराणींनी ही पैठणी परिधान केली होती. काळ्या रंगाच्या आणि सो टक्का खऱ्या सोन्याच्या पदरासमोर सगळंचं शुल्लक ठरलं. या नऊवारी समोर मोठ्या मोठ्या लोकांच्या महागड्या कपड्यांचे सौंदर्य फिके पडले. कार्यक्रमाला ७०० हून अधिक दिग्गज लोक आले होते. सगळ्यांची नजर महाराणींच्या साडीवरच होती.

महाराणींची पैठणी फक्त रेखीव आहे म्हणून गाजली नाही. तर ती गाजली तिच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी. ही  पैठणी तब्बल १०० वर्षांपूर्वीची आहे. एक एक धागा हाताने विणलेला आहे. त्या काळच्या सोन्याने तयार केलेला पदर आणि त्यावरील बारीक छान काम याने कार्यक्रमाची शोभा वाढवली. घराण्याची १०० वर्षे जुनी साडी संग्रहालयातून काढून परिधान करण्याचा महाराणींचा निर्णय सर्वांच्याच पसंतीस पडला. 

महाराणी राधिकाराजे गायकवाड यांना भारतातील सगळ्यात सुंदर महाराणी म्हणून संबोधले जाते. त्या नुसत्या सुंदर नाहीत तर फार हुशार देखील आहेत. महाराणींनी इंस्टाग्रामला माहिती पोस्ट केल्यानंतर विविध माध्यमांनी त्याची दखल घेतली.
 

Web Title: The most beautiful queens of India wore a 100-year-old saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.