Join us

ऑपरेशन करुन काढून टाकलं पोट, पण फूड ब्लॉगर म्हणून कमावलं नाव! पाहा जिद्दीची व्हायरल गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2024 19:11 IST

The Gutless Foodie अशी ओळख असणाऱ्या प्रसिद्ध फूड ब्लॉगर तसेच शेफ नताशा डिड्डी यांचं नुकतंच निधन झालं...

ठळक मुद्दे१२ वर्षांपुर्वी नताशा यांना पोटात ट्यूमर झाला होता. त्यामुळे त्यांचं पोट काढून टाकण्यात आलं होतं.

पुण्याच्या नताशा डिड्डी हे सोशल मिडियावरचं लोकप्रिय नाव. the Gutless Foodie म्हणून त्या ओळखल्या जातात. याच नावाने त्यांचं इन्स्टाग्राम चॅनल असून त्यावर त्यांचे तुफान फॉलाेव्हर्स आहेत. पण शोकांतिका म्हणावं असं त्यांच्या आयुष्यात काही वर्षांपुर्वी घडलं... त्रास झालाच. खूप वेदनाही झाल्या. पण त्याच्यावर मात करून, त्या दु:खाला- वेदनांना हरवून त्यांनी पुन्हा एकदा जगणं सुरू केलं. अखेर मृत्यू समोर उभा ठाकला आणि २४ मार्च रोजी त्यांनी पुणे येथे शेवटचा श्वास घेतला. पोट नसणारी पट्टीची खवय्या अशी त्यांची ओळख निर्माण होण्यामागचं बघा नेमकं कारण...

 

नताशा पेशाने फूड ब्लाॅगर तसेच शेफ होत्या. त्यामुळे त्या किती खवय्या असतील, हे वेगळं सांगायलाच नको. पण १२ वर्षांपुर्वी नताशा यांना पोटात ट्यूमर झाला होता. त्यामुळे त्यांचं पोट काढून टाकण्यात आलं होतं.

लग्नसराई स्पेशल : आर्टिफिशियल पोल्की ज्वेलरी घ्या, पाहा नजर खिळवून ठेवणारे स्टायलिश- सुंदर दागिने

तरीही त्या शेफ आणि फूड ब्लॉगर म्हणून खूप ॲक्टिव्ह होत्या. आता त्यांच्या मृत्यूमागचं कारण पोटाचा ट्यूमर हेच आहे का, याबाबत अजून काही स्पष्ट झालेलं नाही. पण काही वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार नताशा यांच्या मागील काही वर्षांत ज्या काही मुलाखती झाल्या आहेत, त्यावरून त्यांना डंपिंग सिंड्रोम होता असं म्हणण्यात आलं आहे. आणि तेच त्यांच्या मृत्यूचं कारण असावं, असं बोललं जातं.  

 

onlymyhealth.com यांनी दिलेल्या वृत्तानुसार पोटाचं ऑपरेशन झाल्यानंतर हा त्रास होऊ शकतो. हा त्रास होण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे अपचनाचा त्रास वाढणे.

आलिया भट नेहमीच करते तिच्या आवडीचं 'हे' खास फेशियल, घरच्याघरी करायला एकदम सोपं

नताशा यांना मागच्या काही वर्षांपासून खाल्ल्यानंतर चक्कर येणे, मळमळणे असा त्रास व्हायचा. हा त्रास वाढल्याने वयाच्या ५० व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ही घटना त्यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच वेदनादायी आहे.

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामअन्न