Join us

लेकीला कॉलेजात सोडायला आलेल्या वडिलांना अश्रू अनावर, भरारी घेणाऱ्या लेकीसाठी..पहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2022 13:21 IST

Unconditional Love Father-Daughter Bond मुलांच्या स्वप्नासाठी त्यांच्यापासून लांब राहणाऱ्या आईवडिलांची आठवण हा व्हिडिओ पाहून नक्की होईल...

बाप लेकीच्या मायेचं अतूट नातं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. बाप लेकीशिवाय राहू शकत नाही तर, लेक बापाच्या मायेशिवाय.वडील आणि लेक यांचं प्रेमळ नातं सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालेला आहे. आपल्या लेकीला कॉलेजमध्ये सोडायला आलेले वडील अतिशय इमोशनल होत रडू लागतात... तो क्षण टिपणारा हा व्हिडिओ आहे.

प्रेक्षा मोहिल यांनी हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. प्रेक्षा म्हणते, "ते मला कॉलेजला सोडायला आले होते. आमच्या स्वप्नाचे डेस्टीनेशन असलेल्या दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये ते मला सोडायला आला. तो माझा पहिला दिवस असल्यामुळे आम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फिरत होतो. त्यावेळी मला कळालं की माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. ते भावनिक झाले होते. खरं म्हणजे त्यांच्या 'काळजाचा तुकडा' त्यांच्यापासून आता लांब राहणार होता म्हणून त्यांना अश्रू अनावर झाले होते. पण त्या अश्रू मला सांगत होते की मी केलेले सर्व त्याग, मी केलेले परिश्रम, हे स्वप्न साकार करण्यासाठी मी केलेलं सर्व काही सार्थकी लागलं. पप्पा आणि मम्मी तुमचे हसरे चेहरे पाहण्यासाठी मी काहीही करू शकते एवढंच सांगेन.. "

मुलं मोठी होतात. घर सोडून आकाशात मोठी भरारी घेतात. आणि आईवडील त्यांच्या स्वप्नांसाठी त्यांना दूरही पाठवतात. पण अनेकदा ही ताटातुट रडवते. इमोशनल करतेच. अनेकांना हा व्हिडिओ पाहून आपले असे दुराव्याचे क्षण नक्की आठवले असतील.

टॅग्स :सोशल व्हायरलपरिवार