सोशल मीडियावर एक सुंदर, इमोशनल व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून काही लहान मुलांचा आपल्या शिक्षकांप्रती सन्मान, प्रेम हे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये असं दाखवलं आहे की एक शिक्षिका शाळेत जाताना स्वत:चा टिफिन घेऊन जायला विसरते. जेव्हा वर्गातील मुलांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी आपापले जेवणाचे डबे उचलून मॅडमसमोर ठेवले. (Teacher Forgot Lunch Students Share Their Tiffins Heartwarming Viral Video Melts Heart)
इंस्टाग्राम युजरनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वर्गातील मुलांनी एका बेंचवर टिफिन ठेवले आहेत आणि शिक्षिकेचा हात धरून सोबत घेऊन येत आहेत. त्यांनी आपल्या हातांनी शिक्षिकेला जेवण भरवलं आहे. भावूक शिक्षिकेनं सर्व मुलांसोबत थोडं का होईना त्यांच्या डब्यातील खाल्लं. या व्हिडिओतून मुलांचा निरागसपणा आणि शिक्षकांप्रती जाणीव दिसून येते. हा नजारा पाहून तुम्हालाही भरून येईल. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरनं लिहिलं की, विद्यार्थ्यांचे त्यांच्या शिक्षकांवर खूप प्रेम आहे. दुसऱ्या एका युजरच्या म्हणण्यांनुसार टिचिंग हे उत्तम प्रोफेशन आहे. कितीही टॉक्सिक लोकं आयुष्यात आली तरी लहान मुलांना भेटून सर्व काही विसरायला होतं. अनेकांना हा व्हिडिओ पाहून आपले शाळेचे दिवस आठवले आहेत.
९० टक्के लोकांना माहिती नसतं कोणत्या तव्यावर डोसा करायचा? ४ स्टेप्स, कुरकुरीत बनेल डोसा
शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं फक्त अभ्यासापुरता मर्यादित नसून यात आपुलकी, माणूसकीसुद्धा असते. यातून खूप मोठी शिकवण मिळते. हे नाते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकासासाठी आवश्यक असते. ३० हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडिओला आले आहेत. तर युजर्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Web Summary : A heartwarming video shows students sharing their lunch with their teacher who forgot her tiffin. The touching gesture highlights the students' love and respect for their teacher, reminding many of their own school days.
Web Summary : एक दिल छू लेने वाला वीडियो वायरल हो रहा है जिसमें छात्र अपनी टीचर के साथ अपना लंच साझा कर रहे हैं क्योंकि टीचर अपना टिफिन लाना भूल गई थीं। यह भावुक कर देने वाला दृश्य छात्रों के प्यार और सम्मान को दर्शाता है।