घरातील बाथरुम ही नेहमीची वापरली जाणारी जागा, त्यामुळे बाथरूमची स्वच्छता करणे तितकेच गरजेचे असते. बाथरूममधील कमोड आणि वॉश बेसिन सतत ओलसर असतात आणि (How To Turn Dirty Wash Basin & Commode Into Pure White at Home) नेहमी वापरले जातात. नेहमीच्या वापराने कमोड आणि वॉश बेसिन ( How to remove yellow stains from wash basin & commode) खराब होतात, तसेच वेळीच स्वच्छ न केल्यास त्यावर पिवळे हट्टी डाग पडतात. हार्ड वॉटर, साबण, किंवा खूप दिवसांनी केलेली सफाई यामुळे हे हट्टी डाग चिकटून बसतात(Tea powder remedy that instantly removes yellow stains on commodes and wash basins).
बेसिन व कमोड हे शक्यतो पांढरेशुभ्र असल्याने त्यावरील पिवळे डाग अगदी सहज दिसतात. काहीवेळा कमोड आणि बेसिनवर पडलेले पिवळे डाग काही केल्या निघत नाहीत आणि त्यामुळे बाथरूम नेहमीच घाणेरडं दिसतं. कमोड किंवा बेसिनवर पिवळे डाग दिसायला विचित्र दिसतातच, पण ते अनेकदा हानिकारक बॅक्टेरियांचे प्रमाण वाढवून, घरात रोगराई पसरवण्यास देखील कारणीभूत ठरतात. यामुळे त्यांना वेळेत स्वच्छ करणे महत्त्वाचे असते. बेसिन व कमोडवरील पिवळे डाग घालवण्यासाठी बाजारातील क्लिनिंग प्रॉडक्ट्सपेक्षा घरगुती उपाय नैसर्गिक आणि सुरक्षित ठरतात. वॉश बेसिन व कमोडवरील पिवळे डाग घालवण्यासाठी घरगुती उपायांमध्ये काय करायचं ते पाहूयात...
वॉश बेसिन व कमोडवरील पिवळे डाग घालवण्यासाठी...
वॉश बेसिन व कमोडवरील पिवळे डाग घालवण्यासाठी, prajaktasalvevlogs या इंस्टाग्राम व्हिडिओवरून खास घरगुती उपाय शेअर कारण्यात आले आहेत. घरातील बाथरुम, वॉश बेसिन व कमोड स्वच्छ करण्यासाठी आपल्याला, पाणी, चहा पावडर, बेकिंग सोडा, व्हिनेगर, शाम्पू इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
बाथरुमच्या पाईपमध्ये केसांचा गुंता अडकून चोकअप होते? ३ ट्रिक्स, पाणी तुंबणार नाही...
गॅस शेगडीवरचे डाग काढा झटपट, घ्या फक्त १ चमचा मीठ-१ चमचा पीठ! पाहा भन्नाट ट्रिक...
करायचं काय ते पाहा...
एका मोठ्या भांड्यात २ ग्लास पाणी घेऊन त्यात २ टेबलस्पून चहा पावडर घालून ते पाणी व्यवस्थित उकळवून घ्यावे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून त्यात ३ टेबलस्पून व्हिनेगर, २ टेबलस्पून बेकिंग सोडा, १ टेबलस्पून शाम्पू घालावा. सगळ्यात शेवटी आपण यात सुगंधासाठी कोणतेही नेहमीच्या वापरतील फिनाईल किंवा लिक्विड क्लिंझर देखील २ टेबलस्पून घालू शकता. हे सगळे मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. आता हे तयार द्रावण थेट बाथरुमच्या फरशीवर, वॉश बेसिनवर तसेच कमोडवर ओतावे आणि ब्रशने व्यवस्थित घासून घ्यावे.
करीना कपूर म्हणते पराठा खाऊनच केली होती झिरो फिगर! ते कसं केलं, वेटलॉसचा सोपा नियम...
१० ते १५ मिनिटे हे तसेच राहू द्यावे त्यानंतर, पाण्याने नेहमीप्रमाणे स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर आपण फरक पाहू शकता, वॉश बेसिन, कमोड आणि बाथरुमच्या फरशीवरील चिकट, पिवळसर हट्टी डाग जाऊन बाथरुम नव्यासारखे चकाचक दिसू लागेल. आठवड्यातून किमान २ वेळा हा उपाय केल्यास बाथरुम कायम स्वच्छ व नीटनेटके राहण्यास मदत होईल.