Join us

अशीही एक आंतरराष्ट्रीय लव्हस्टोरी! बिहारी तरुणाच्या प्रेमात दिवानी एक युरोपिअन तरुणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2022 14:21 IST

Social Viral Video बिहारमध्ये नुकताच हा विवाह संपन्न झाला आणि सोशल मीडियात गाजला.

सोशल मीडियावर देखील लग्नाचे अनेक हटके व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यातच एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. एका जर्मन तरुणीनं नुकतीच भारतीय रितीरिवाजानुसार भारतीय तरुणाशी लग्नगाठ बांधली. सध्या या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगलीय. कुठं बिहारमधलं गाव ते कुठं जर्मनी अशी ही इंटरनॅशनल लव्हस्टोरी आहे.

तर लव्ह स्टोरी इथून सुरू झाली..

बिहारच्या सहरसाच्या पटुआहा गावात राहणारा चैतन्य झा, हा जर्मनीत पीएचडी करायला गेला होता. यावेळी तेथील कॉलेजमध्ये त्याची ओळख मार्थासोबत झाली. मार्था देखील पीएचडी करत होती. येथे शिकत असताना दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  मार्थाने चैतन्यसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी दोघांनी आपापल्या कुटुंबियांशी बोलणी केली. आणि कुटूंबियांनी देखील लग्नाला परवानगी दिली.

मार्था पोलंडची रहिवासी ऑर्लोस्का यांची मुलगी आहे. लग्नासाठी ती जर्मनीहून तिच्या कुटूंब आणि नातेवाईकांसह भारतात आली. बिहारच्या सहरसा येथे तिचे मैथिल रितीरिवाजानुसार लग्न पार पडले. सध्या त्यांच्यामध्ये भाषेचं अंतर आहे. मात्र, ३ ते ४ महिन्यात हिंदी शिकणार असल्याचे तिने वचन दिले आहे. या लग्नाची बिहारमध्ये एकच चर्चा रंगली असून, सोशल मीडियावर याचे फोटो तुफान व्हायरल झालेत.

टॅग्स :सोशल व्हायरलजर्मनीबिहारसोशल मीडियादिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट