Lokmat Sakhi >Social Viral > ३० मिनिटांत पांढर्‍या कपड्यांवरचे डाग गायब - घरी तयार करा हा जादूई फॉम्युला, फॅब्रिक राहते नव्यासारखे

३० मिनिटांत पांढर्‍या कपड्यांवरचे डाग गायब - घरी तयार करा हा जादूई फॉम्युला, फॅब्रिक राहते नव्यासारखे

Stains on white clothes will disappear in 30 minutes - prepare this magic formula at home, the fabric remains like new : पांढरे कपडे नव्यासारखे ठेवण्यासाठी करा घरीच हा उपाय. पाहा काय करायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2025 15:21 IST2025-08-15T15:19:46+5:302025-08-15T15:21:27+5:30

Stains on white clothes will disappear in 30 minutes - prepare this magic formula at home, the fabric remains like new : पांढरे कपडे नव्यासारखे ठेवण्यासाठी करा घरीच हा उपाय. पाहा काय करायचे.

Stains on white clothes will disappear in 30 minutes - prepare this magic formula at home, the fabric remains like new | ३० मिनिटांत पांढर्‍या कपड्यांवरचे डाग गायब - घरी तयार करा हा जादूई फॉम्युला, फॅब्रिक राहते नव्यासारखे

३० मिनिटांत पांढर्‍या कपड्यांवरचे डाग गायब - घरी तयार करा हा जादूई फॉम्युला, फॅब्रिक राहते नव्यासारखे

पांढरे कपडे घालायचे म्हणजे जरा चिंताच असते. दिसायला पांढरे कपडे फारच सुंदर दिसतात. अगदी साधा आणि ताजेलदार असा हा रंग वापरायला नक्कीच छान वाटते. (Stains on white clothes will disappear in 30 minutes - prepare this magic formula at home, the fabric remains like new)लग्न समारंभ किंवा इतर ठिकाणी असे कपडे घालण्याची इच्छा असूनही घालता येत नाहीत. कारण साधा घाम आला तरी त्याचे डागही पांढर्‍या कपड्यांवर पटकन दिसून येतात. कापड खराब होते. तसेच पारदर्शक होतात आणि ते घालणे कठीण होते. त्यामुळे पांढरे कपडे धुताना काळजी घ्यावी लागते. त्यात पावसाळ्यात चिखल आणि पाण्याचे डागही लागतात. जर कोणता चिवट डाग कपड्यावर लागला तर तो जाता जात नाही. पांढर्‍या रंगावर ते अगदीच उठून दिसतात. त्यामुळे ते घालता येत नाहीत. 

विकतचे अनेक प्रॉडक्ट वापरुनही बरेचदा हे डाग जात नाहीत. शिवाय विकच्या प्रॉडक्ट्समुळे कपड्याचा दर्जा खराब होतो. कापड फाटते आणि दिसायलाही अगदी डल होते. त्यामुळे जर पांढऱ्या कपड्यांवर डाग पडले असतील तर ते काढण्यासाठी घरीच मस्त सोपा फॉम्युला तयार करा आणि तोच वापरा. अगदी सोपा आहे आणि प्रभावी आहे. पांढरे कपडे नेहमीच शुभ्र, स्वच्छ आणि चमकदार दिसावेत यासाठी बाजारातील डिटर्जंट किंवा ब्लीच वापरण्याऐवजी घरीच नैसर्गिक आणि सुरक्षित फॉर्म्युला तयार करा. घरच्या घरी तयार केलेला हा उपाय कपड्यांवर सौम्य असून त्वचेलाही त्रास देत नाही. 

एका मोठ्या बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात अर्धा कप बेकिंग सोडा घाला. पाणी जास्त गरम नका वापरु त्यामुळे कपडे फाटतात. त्यामुळे कोमट पाणी घ्या. बेकींग सोडा कपड्यांवरील मळ आणि डाग काढण्यासाठी एकदम प्रभावी आहे. तसेच कपड्यांचा पांढरा रंग राखून ठेवण्यासाठी बेकींग सोडा फायदेशीर असतो. त्यात अर्धा कप व्हिनेगर घाला. व्हिनेगर मध्ये अनेक असे उपयुक्त घटक असतात जे स्वच्छता करण्यासाठी प्रभावी असतात. कपड्यांचा वास त्यामुळे निघून जातो. तसेच कपड्याचा दर्जा,  फॅब्रिक मऊ ठेवण्यासाठी मदत करतो. डाग जातच नसतील तर काही थेंब लिंबाचा रस टाकायचा. कारण लिंबातील नैसर्गिक आम्ल कपड्यांवरील पिवळसर डाग काढण्यात मदत करते. हे मिश्रण चांगले ढवळायचे. त्यात पांढरे कपडे किमान अर्धा तास  भिजत ठेवायचे. नंतर नेहमीप्रमाणे स्वच्छ पाण्याने धुवा आणि उन्हात वाळवा, कारण उन्हाची किरणे नैसर्गिकरीत्या कपड्यांना निर्जंतुक करून त्यांचा पांढरा रंग चांगला ठेवतात. हा घरगुती फॉर्म्युला केवळ स्वस्त आणि सोपा नाही, तर आरोग्यच्यादृष्टिनेही चांगला ठरतो. 

Web Title: Stains on white clothes will disappear in 30 minutes - prepare this magic formula at home, the fabric remains like new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.