Join us

Spitting In Food : किती हा विचित्रपणा! सुपरमार्केटमधील खाण्यापिण्याच्या वस्तूंवर थुंकायची महिला; व्हिडीओ समोर येताच अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 18:54 IST

Spitting In Food : सोडा आणि कँडीच्या पाकीटांच्या बाबतीतही तिनं असाच प्रकार केला.

सुपरमार्केटमध्ये रोज हजारो लोक दैनंदिन  जीवनात लागणाऱ्या गोष्टी घेत असतात.  सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा विचित्र प्रकार व्हायरल होत आहे. शॉपिंग मॉलमध्ये एक महिला  वस्तूंना थुंकी लावून तिथेच  ठेवत होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी या महिलेला अटक करण्याची मागणी केली आहे. (Women Spitting In Food) 

अमेरिकेतील महिलेनं मॉलमध्ये केलेला विचित्र प्रकार पाहून लोकांना संताप अनावर झाला आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार ही घटना दक्षिण अमेरिकेच्या  Nashville मधून समोर आला आहे. मॉलमधील या महिलेच्या व्हिडीओनं खळबळ माजवली आहे. मॉलमध्ये महिला चिप्सचं पाकीट उघडून त्यातल्या चिप्सची चव पाहते त्यानंतर त्यात थुंकून पुन्हा पाकीट बंद करते. 

 हाच प्रकार या महिलेनं पाण्याच्या बाटलीसह केला. पाण्यच्या बाटलीला तोंड लावून या महिलेनं पुन्हा बॉटल तिथेच ठेवली. ही महिला मेकअप आर्टिस्ट लिब्बी बार्न्स असल्याची माहिती समोर आली आहे. सोडा आणि कँडीच्या पाकीटांच्या बाबतीतही तिनं असाच प्रकार केला. हा व्हिडीओ कोणी  काढला याबाबत माहिती मिळालेली नाही. 

लिब्बी बार्न्सला याचा काहीही फरक पडलेला नाही ती कॅमेरात हसताना दिसून आली.  महिलेनं उत्तर दिलंय की, मी चोर नाही. मी चव पाहिलेली उत्पादन विकत घेण्याच्या विचारात असते. याआधी तिनं उघडलेल्या वस्तू तिनं विकतही घेतल्या होत्या असं समोर आलंय. दरम्यान ग्राहक सुरक्षेच्या कारणास्तव या महिलेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरल