घरात कोणतीही वस्तू तुटली तर ती चिकटवण्यासाठी फेविक्वीकचा वापर केला जातो. प्लास्टिकपासून ते सर्व पदार्थ चिकवण्यासाठी फेविक्विक फायदेशीर ठरतो. पण खूपदा फेविक्विक हाताच्या बोटांना चिकटतो मग हात कसे स्वच्छ करायचे ते कळत नाही (How To Remove Feviquick From Hands Naturally). लहान मुलांच्या हाताला फेविक्विक चिकटले तर स्वच्छ करणं खूपच कठीण वाटतं. फेविक्विक त्वचेवर चिकटलं तर ते काढून टाकण्यासाठी तुम्ही काही झटपट सोपे उपाय करू शकता. या उपायांनी चिकटलेलं फेविक्विक लगेच निघून जाण्यात मदत होईल. (How To Remove Feviquick From Skin) हातही खराब होणार नाहीत या सोप्या ट्रिक्स कोणत्या ते पाहूया.
मिठाचा वापर करा
त्वचेवर लागलेलं फेविक्विक काढून टाकण्याासठी तुम्ही मिठाचा वापर करू शकता. फेविक्विक चिकटतं त्या ठिकाणी थोडं मीठ घालून रगडून स्वच्छ करा. हा उपाय केल्यास फेविक्विकचा ग्लू लगेच निघून जाईल. तुम्ही मिठात थोडं व्हिनेगरही मिसळू शकता. मीठ आणि व्हिनेगर ब्रशच्या मदतीनं लावून घ्या. ज्यामुळे त्वचेवरील फेविक्विक सहज निघून जाण्यास मदत होईल.
उडुप्पी हॉटेलस्टाईल ओल्या नारळाची चटणी करा घरीच; ५ मिनिटांत होईल चवदार चटणी, घ्या रेसिपी
नेलपेंट रिमुव्हरचा वापर करा
हाताला लागलेलं फेविक्वीक काढून टाकण्यासाठी नेलपेंट रिमुव्हरचा वापर करा. लहान मुलांच्या त्वचेवर फेविक्विक चिकटल्यास नेल पेंट रिमुव्हरनं फेविक्विक काढून टाकण्यास मदत होते. नेलपेंट रिमुव्हर ३ ते ४ मिनिटांसाठी त्वचेवर लावलेलं राहू द्या. ज्यामुळे फेविक्विक सहज निघून जाईल. कपड्यांवरचेही फेविक्विकचे डाग तुम्ही नेलपेंट रिमुव्हरनं साफ करू शकता. ज्यामुळे फेविक्विक सॉफ्ट होऊन निघून जाईल.
लिंबानं फेविक्विक हटवा
लिंबाचा वापर करून तुम्ही फेविक्विक काढू शकता. स्किनवरचं फेविक्विक काढण्यासाठी लिंबू एसिडप्रमाणे काम करतो ज्यामुळे फेविक्विक निघून जाण्यास मदत होते. म्हणूनच जिथे फेविक्विक चिकटतं तिथं लिंबाचा रस काहीवेळासाठी लावून ठेवा. नंतर ब्रशच्या मदतीनं क्लिन करा.
केस खूपच तुटतात? जावेद हबीब सांगतात तेलात 'हा' पदार्थ कालवून लावा, दाट-लांब केसांच गुपीत
कोमट पाणी आणि साबण
जर तुम्हाला कोणतेही उपाय करायचे नसतील आणि हात स्वच्छ करायचे असतील तर पाणी कोमट करून हात साबणाच्या पाण्यात बुडवा. ज्यामुळे फेविक्विक लगेच निघून जाईल. तुम्ही ब्रशनं रगडून साफ करू शकता ज्यामुळे फेविक्वीक सहज निघून जातील.