Lokmat Sakhi >Social Viral > पावसामुळे खराब झालेल्या खिडक्या साफ करण्यासाठी खास उपाय, 'असा' तयार करा जबरदस्त फॉर्म्युला

पावसामुळे खराब झालेल्या खिडक्या साफ करण्यासाठी खास उपाय, 'असा' तयार करा जबरदस्त फॉर्म्युला

Special solution to clean windows damaged by rain, prepare this amazing formula : पावसाळ्यात खराब झालेल्या खिडक्या स्वच्छ करा या सोप्या पद्धतीने. सोपे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 11:59 IST2025-07-21T11:55:52+5:302025-07-21T11:59:38+5:30

Special solution to clean windows damaged by rain, prepare this amazing formula : पावसाळ्यात खराब झालेल्या खिडक्या स्वच्छ करा या सोप्या पद्धतीने. सोपे उपाय.

Special solution to clean windows damaged by rain, prepare this amazing formula | पावसामुळे खराब झालेल्या खिडक्या साफ करण्यासाठी खास उपाय, 'असा' तयार करा जबरदस्त फॉर्म्युला

पावसामुळे खराब झालेल्या खिडक्या साफ करण्यासाठी खास उपाय, 'असा' तयार करा जबरदस्त फॉर्म्युला

पावसाळा आनंद आणि मस्त वातावरण घेऊन येतो. मात्र पावसाळ्यात आरोग्याची फार काळजी घ्यावी लागते. फक्त आरोग्याची नाही तर घराचीही काळजी घ्यावी लागते. (Special solution to clean windows damaged by rain, prepare this amazing formula)खास म्हणजे घराच्या खिडक्या आणि त्याच्या काचा. सतत पडणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळे काचेवर पाण्याचे डाग, मळ, धूळ आणि काही वेळा बुरशीसुद्धा जमा होते. लोखंडी किंवा अ‍ॅल्युमिनियम फ्रेम असलेल्या खिडक्यांना गंज चढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात खिडक्यांची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरते. लाकूड फुगते त्यामुळे खिडक्या, दरवाजे बंद होत नाहीत. 

खिडक्या स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे काच पुसणे गरजेचे असते. पावसाचे पाणी वाऱ्यासोबत वाकडे तिकडे पडते. त्यात असलेली धूळ, प्रदूषण किंवा काही वेळा झाडांची पानेकाचांवर चिकटून बसतात. यासाठी एक साधा उपाय म्हणजे कोमट पाण्यात थोडासा लिक्विड सोप किंवा व्हिनेगर मिसळून त्या मिश्रणाने काचा स्वच्छ पुसणे. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून काचांवर फवारून मऊ सूती कापडाने किंवा मायक्रोफायबर कापडाने स्वच्छता करावी. अशा प्रकारे स्वच्छता केल्यास पाण्याचे डाग आणि चिकटपणा सहज निघून जातो. काचा पारदर्शक असतील तर त्याच छान स्वच्छ होतात.

जर खिडक्यांची चौकट लोखंडाची असेल तर गंज टाळण्यासाठी त्या भागांवर वारंवार कोरडे फडके फिरवणे आवश्यक आहे. त्यावर सतत ऑईलिंग करायचे म्हणजे गंज चढणार नाही. अतिही तेल लावायचे नाही. मात्र ठराविक दिवसांनी छान तेल लावायचे. अ‍ॅल्युमिनियम किंवा पीव्हीसी खिडक्यांसाठी विशेष क्लीनर बाजारात उपलब्ध आहेत, पण घरच्या घरीच तयार केलेला सोडियम बायकार्ब आणि लिंबाचा रस वापरूनही स्वच्छता करता येते. या मिश्रणामुळे गंज आणि डाग दोन्ही निघतात.

काचांवर बुरशी किंवा काळसर डाग जमा झाले असल्यास, थोडा हायड्रोजन पेरॉक्साईड वापरून त्या ठिकाणी हलक्या हाताने पुसावे. हे बुरशीसाठी प्रभावी आहे. तसेच, खिडकीच्या रुळांमध्ये पाणी साचून खराब झाले असेल तर ते ब्रशने स्वच्छ करता येते. यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करून त्या ठिकाणी स्वच्छता करता येते.

पावसाळ्यात शक्यतो खिडक्या अर्धवट उघड्या ठेवाव्यात, जेणेकरून आत-बाहेरचा हवामानाचा समतोल राहतो आणि बाष्प साचत नाही. खिडकीजवळच्या पडद्यांनाही वेळोवेळी धुवून स्वच्छ करावे. कारण ओलसर पडदेही काचांवरची बुरशी वाढवतात.

Web Title: Special solution to clean windows damaged by rain, prepare this amazing formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.