Join us

AI Saree Trend : AI ने दिलेला रेट्रो लूक फोटो पाहून चपापली महिला! म्हणाली सावध व्हा, नाहीतर.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 13:04 IST

Google Gemini's Nano Banana AI saree: सध्या व्हायरल होत असणारा हा रेट्रो साडी लूक ट्रेण्ड तुम्हीही फॉलो करत असाल तर एकदा ही खरी घटना वाचायलाच हवी...(woman Uploaded her image on Gemini and found something creepy)

सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेण्ड येईल आणि तो व्हायरल होईल ते सांगता येत नाही. मध्यंतरी काही वर्षांपुर्वी नथीचा नखरा ट्रेण्ड आला होता. त्यानंतर आताच काही दिवसांपुर्वी हळदीच्या पाण्याचा ट्रेण्डही खूप गाजला. आता पुन्हा एकदा एक नवाच ट्रेण्ड आला आहे. लाल, काळ्या किंवा सोनेरी रंगाची प्लेन साडी, त्यावर मॅचिंग स्लिव्हलेस ब्लाऊज, मोकळे सोडलेले केस आणि केसांमध्ये माळलेला गजरा असा स्वत:चा रेट्रो लूकमधला फोटो AI Google Gemini ॲपच्या मदतीने तयार करून घेणे (Google Gemini's Nano Banana AI saree retro look) आणि तो सोशल मीडियावर अपलोड करणे असा तो सगळा प्रकार आहे. तरुणींमध्ये हा ट्रेण्ड जबरदस्त गाजत असून कित्येकींचे व्हॉट्सॲप, इंस्टा स्टेटसही तेच आहे.(woman Uploaded her image on Gemini and found something creepy)

 

ते फोटो एवढे आकर्षक येत आहेत की कोणालाही स्वत:चा अशा पद्धतीचा फोटो तयार करून घेण्याचा मोह होणे अगदी स्वाभाविक आहे. पण तो मोह तुमच्या कसा अंगलट येऊ शकतो, याविषयीची स्वत:ची आपबिती सांगणारा एक अनुभव तरुणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शरीरातलं HB खूप कमी झालंय हे सांगणारी ५ लक्षणं, वेळीच ओळखा आणि तब्येत सांभाळा

ती तरुणी सांगते की तिलाही स्वत:चा रेट्रो लूकमधला फोटो तयार करून घ्यायचा होता. त्यामुळे हिरव्या रंगाचा पुर्ण बाह्यांचा सलवार कुर्ता घातलेला ड्रेस तिने AI Google Gemini ला दिला. त्यानंतर काही वेळातच एआयने तिचा काळ्या साडीतला अतिशय सुंदर फोटो तयार करून दिला. काळी साडी आणि स्लिव्हलेस ब्लाऊज असा तो फोटो होता. 

 

तो फोटो जेव्हा त्या तरुणीने अधिक बारकाईने पाहिला तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की त्या फोटोमध्ये तिच्या डाव्या दंडावर असणारा तीळ दिसतो आहे. तो पाहून ती तरुणी थोडी चपापली. कारण तिने गुगलला जो फोटो दिला होता तो तर पुर्ण बाह्या असणाऱ्या ड्रेसचा होता.

चहा प्यायल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही ना? बघा त्याचे शरीरावर काय परिणाम होतात 

मग तो दंडावरचा तीळ गुगलला कसा दिसला? असा प्रश्न तिला पडला आणि ती भांबावून गेली. आपण जेवढं समजतो तेवढं हे ॲप सुरक्षित नाही. आपला एक फोटो दिला की त्याला आपल्या फोनमधल्या सगळ्या फोटोंचा ॲक्सेस मिळतो आणि तो अशा पद्धतीच्या इमेज तयार करून देतो. त्यामुळे कोणतीही माहिती, स्वत:चा फोटो अशा पद्धतीने गुगलवर अपलोड करण्यापुर्वी थोडी काळजी घ्या, असा सल्ला या विषयातले तज्ज्ञ देत आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामसाडी नेसणे