Join us  

आइस्क्रीम आणि मोमो दोघांचा अपमान? काय तर म्हणे, मोमोज् आइस्क्रीम रोल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 3:03 PM

Trending video: खाण्यात तुम्ही प्रयोग करा.. पण हे असे? अतरंगी प्रयोग? कुठे आईस्क्रिम आणि कुठे मोमोज.. (ice cream and momo) हे काय भलतंच, हा व्हिडिओ पाहून चांगलेच चक्रावलेत नेटकरी 

ठळक मुद्देमोमोज आइस्क्रिम रोल हा एक खतरनाक पदार्थ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे..

काेण काय करेल, याचा काही नेम नाही.. किंवा कोणाला कोणता खाद्यपदार्थ कशासोबत खायला आवडेल हे देखील काही सांगता येत नाही.... म्हणूनच तर नेटवर आपल्याला नेहमीच खाद्य पदार्थांचे असे अतरंगी व्हिडिओ बघायला मिळतात.. खाद्य पदार्थांसोबत केलेले हे प्रयोग पाहून खरोखरंच हसावं की रडावं हेच कळत नाही.. आता हेच बघा ना .. हा व्हायरल झालेला व्हिडिओ (viral video) म्हणजे आईस्क्रिम आणि मोमोज या दोन्ही सुपरहिट पदार्थांचा मोठ्ठा अपमान आहे, असं नेटकरी मंडळींना वाटत आहे.. 

 

तर त्याचं झालं असं की मोमोज आइस्क्रिम रोल हा एक खतरनाक पदार्थ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.. curly.tales या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो जबरदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली रेसिपीच एवढी भन्नाट आहे की अवघ्या काही तासांमध्येच व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. 

 

यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की तो विक्रेता सगळ्यात आधी मोमोज घेतो, तो तोडतो, चांगल्या पद्धतीने स्मॅश करतो. नंतर त्यात क्रिम किंवा दुधासारखा दिसणारा एक पदार्थ टाकतो. पुन्हा ते रगडून रगडून स्मॅश करतो. नंतर त्यात आईस्क्रिम टाकतो. लाल तिखट चटणी टाकून स्मॅश करतो आणि त्या अतरंगी पदार्थांचा रोल करून खवय्यांना सर्व्ह करतो. हा पदार्थ सर्व्ह करताना पुन्हा तो त्यावर लाल चटणी आणि क्रिमसारखा दिसणारा एक पदार्थ देतो आहे..  

 

मोमो आणि आईस्क्रिम लव्हर असणाऱ्या खवय्यांना त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा केलेला असा हा खेळखंडोबा अजिबातच आवडलेला नाही. त्यामुळे काही जण जाम भडकले आहेत. तुम्ही या दोन अतिशय टेस्टी पदार्थांसोबत असा भलताच आगाऊपणा का केला असा प्रश्नही यानिमित्ताने नेटकरी त्या विक्रेत्याला विचारत आहेत.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्नइन्स्टाग्राम