Join us

Social Viral : बाबौ! ३० वर्षांपासून तिला मनासारखा बॉयफ्रेंड मिळालाच नाही; शेवटी अशी पूर्ण केली प्रेग्नंसीची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 12:30 IST

Social Viral : आई होण्याचा सुखद अनुभव घेण्याची इच्छा मला होती. त्यासाठी मी योग्य पार्टनरचा शोध घेत होती. मी माझ्या मित्र मैत्रिणींना मस्करीनं म्हणायची की मला एकटीलाच प्रेंग्नंट व्हावं लागेल.

एका महिलेनं प्रेग्नंसीसाठी एक आगळा वेगळा मार्ग निवडला आणि त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. द मिररला दिलेल्या मुलाखतीत इंग्लंडची रहिवासी असलेल्या या महिलेनं आपल्या प्रेग्नंसीची पूर्ण कहाणी सांगितली आहे. डेनियल बटल नावाच्या या महिलेनं सांगितलं की, परफेक्ट पार्टनरच्या शोधात तिनं  ३० वर्ष घालवले आणि एकटी राहिली. अखेर पार्टनरशिवाय गरोदर होण्याचा निर्णय घेतला. 

आई होणं हा प्रत्येक स्त्रीसाठी सुखद, अविस्मरणीय अनुभव असतो. आपल्या बाळासाठी अनेक पती पत्नी मिळून प्लॅनिंग करतात. दरम्यान इंग्लंडच्या या महिलेनं प्रेग्नंसीसाठी वेगळाच मार्ग अवलंबला आहे. डेनियलनं सांगतिलं  की, ''आई  होण्याचा सुखद अनुभव घेण्याची इच्छा मला होती. त्यासाठी मी योग्य पार्टनरचा शोध घेत होते. मी माझ्या मित्र मैत्रिणींना मस्करीनं म्हणायचे की मला एकटीलाच प्रेंग्नंट व्हावं लागेल. पण माझी ही मस्करी सत्यात उतरली. मी फेसबुकवर सिंगल मॉम बाय चॉईस असा एक ग्रुप जॉईन केला नंतर स्वत:ची फर्टिलिटी चाचणीही केली आणि या प्रक्रियेला आरंभ केला. माझ्या या निर्णयात मला कुटुंबियांनी पूर्ण साथ दिली.''

पुढे तिनं सांगितले की, ''मी स्पर्म बँकेतून एक फिट, स्मार्ट स्पर्म डोनरची निवड केली आणि नोव्हेंबर २०२० मध्ये आयव्हीएफ करून घेतलं. तो स्पर्म डोनर खूपच चांगला आणि काळजी घेणारा होता. IVF मध्ये माझे एग्स फर्टिलाईज्ड झाले होते.  ११  दिवस वाट पाहिल्यानंतर मला आनंदाची बातमी मिळाली. माझा स्वत:वर विश्वासच बसत नव्हता. हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय होता.''

''माझी प्रेग्नंसी व्यवस्थित होती पण ३६ व्या आठवड्यात मला डायबिटीस झाला त्यामुळे डॉक्टरांनी लकवर डिलिव्हरी करण्याचा विचार केला. अखेर माझं स्वप्न पूर्ण झालं जेव्हा माझ्या हातात माझा रॉबिन होता.  हा माझ्यासाठी अद्भूत अनुभव होता. मी माझ्या मुलाला मोठा झाल्यानंतर त्याचा जन्म कसा झाला हे नक्की सांगेन.  म्हणूनच मी एकटं राहण्याच्या निर्णयामुळे खूप खूश आहे. '' असंही तिनं सांगितलं. 

टॅग्स :महिलासोशल व्हायरलप्रेग्नंसीगर्भवती महिला