Join us  

Social Viral : नायटी घालून फ्लायओव्हरखाली डान्स चांगलाच अंगाशी आला; व्हिडीओ व्हायरल होताच पाठवली नोटीस.....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 5:05 PM

Social Viral : या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता साहा शहरातील फ्लायओव्हरवर उभ्या असलेल्या कार मधून बाहेर निघतो आणि डिव्हाडरपर्यंत नाचत नाचत जातो.

रस्त्यावर डान्स करून व्हिडीओ शूट करणं यात काही नवीन नाही. आजकाल अनेक तरूण तरूणी इंस्टाग्राम रिल्स बनवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी परवानगी नसताना आपले व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. पश्चिम बंगालचा सोशल मीडिया इंफ्लूएंसर (social media influencer) सैंडी साहाचा (Sandy Saha) व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. फ्लायओव्हरखाली डान्स करणं या तरूणाच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. 

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता साहा शहरातील फ्लायओव्हरवर उभ्या असलेल्या कार मधून बाहेर निघतो आणि डिव्हाडरपर्यंत नाचत नाचत जातो. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार कोलकाता पोलिसांनी मंगळवारी याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. लालबाजारमधील वाहतूक नियंत्रण कक्षानं सीसीटिव्ही फुटेज आणि फेसबुकवर सँडी साहाद्वारे शेअर केलेला व्हिडीओ पाहून कार मालकाची ओळख पटवली.

३ मिनिटे ३८ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये तो, मै आई हूं यूपी बिहार लूटने या गाण्यावर नाचताना दिसतोय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला प्रोत्साहन देण्यासाठी मा फ्लायओव्हर हाच उड्डाणपूल आहे जो अलीकडेच एका वृत्तपत्राच्या जाहिरातीत छापण्यात आला होता. अनेक सोशल मीडिया युजर्समध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने बांधलेला उड्डाणपूल म्हणून 'मा फ्लायओव्हर'ची ओळख  आहे. 

मूल होण्यासाठी तिनं ऑनलाईन शुक्राणू मागवले अन् गरोदर झाली; मग घडलं असं काही....

गेल्या सोमवारी पोस्ट केल्यापासून हा व्हिडिओ फेसबुकवर 4.2 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. कमेंट्स विभागात, बर्‍याच लोकांनी कोलकाता पोलिसांना टॅग केले आणि त्यांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यास सांगितले आहे. 

शॉर्ट्स घातले म्हणून तिला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; म्हणाले स्कार्फ गुंडाळून परिक्षेला बस

कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि व्हिडिओशी संबंधित सँडी साहा आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकांना नोटीस पाठवली. फर्स्टपोस्टच्या रिपोर्टनुसार, 1.5 दशलक्षाहून अधिक फेसबुक फॉलोअर्स असलेल्या सँडी साहाने कोणतीही चूक केल्याचं नाकारले आहे. नंतर त्याने कबूल केले की फ्लायओव्हरवर कार थांबवण्यास मनाई आहे हे त्याला माहित नव्हते.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियापश्चिम बंगाल